लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संयम आणि सबुरीची शिकवण देणारी रमजान ईद जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ईदगाह वर विशेष नमाज अदा करण्यात आली. यानंतर गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.भंडारा शहरात सकाळपासूनच ईदनिमित्त उत्साह दिसून येत होता. शहरातील दसरा मैदानाजवळील ईदगाहसह खामतलाव मशिद, जामा मशिद, सौदागर मोहल्ला, बाबा मस्तानशाह मशिद, मेंढा मशिद, तकीया दर्गा मशिद आदी ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. ईद हा आनंदाचा सण असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला दिसत होता. लहान मोठ्यांनी नवीन वस्त्र परिधान करून ईदची नमाज अदा केली. अल्लाहच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देत होत्या. हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आप्तजनांना मित्रांना शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले होते.मोहाडी येथील जामा मशिदीत सकाळी ९ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली.यावेळी प्रत्येकाच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. पवनी येथे ईदगाहवर सकाळी ९ वाजता नमाज अदा करण्यात आली. यावेळी प्रत्येक जण नवीन वस्त्र परिधान करून यात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ईदगाहमध्येही ईद निमित्त नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांकडे शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बंधूत्वाचे संबंध प्रस्तापित करणारा सणआपआपसात बंधुत्वाचे संबंध प्रस्तापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण म्हणजे रमजान ईद होय. ईद-उल-फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदच्या शुभपर्वाला गरीब, अनाथ आनंदापासून वंचित राहात असेल तर ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा यासाठी जकात व फितराची तरतुद मुस्लिम धर्मग्रंथात करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिली जाते. त्यामुळे त्यांनी वर्षातून दोनदा येणाºया महान पर्व ईदचा आनंद लुटता यावा. अशी ही ईद जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.
जिल्ह्यात ईद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:35 IST
संयम आणि सबुरीची शिकवण देणारी रमजान ईद जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ईदगाह वर विशेष नमाज अदा करण्यात आली. यानंतर गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्ह्यात ईद उत्साहात
ठळक मुद्देठिकठिकाणी नमाज अदा : गळाभेट घेऊन दिल्या एकमेकांना शुभेच्छा