शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सनफ्लॅग कंपनीत पहाटे भीषण स्फोट, 3 कामगार  जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2024 10:22 IST

परिसर हादरला; सात ते आठ कामगार किरकोळ जखमी

तथागत मेश्राम, लोकमत न्यूज नेटवर्क, वरठी (भंडारा) : सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ वाजता भीषण स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेत ७ - ८  कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. 

सदर घटना कंपनीतील एसएमएस या विभागातील एल एच एफ युनिट मध्ये झाली. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजल्या गेले व काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

गंभीर जखमींची प्रकृती धोक्याबाहेर

अधिक प्रमाणात जखमी झालेल्यांमध्ये टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. 

स्फोटाने परिसर हादरला

स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर हादरला होता. या दुर्घटनेत कंपनीतील साहित्याचे आणि मशिनरीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

व्यवस्थापनाकडून परिसर सील

अपघातात या घटनेनंतर काही वेळातच व्यवस्थापनाने हा संपूर्ण परिसर सील केला. आत प्रवेश करण्यास मज्जाव केला जात असून गेटवरूनच सर्वांना परत पाठविले जात आहे. त्यामुळे आत नेमके काय घडले,  आणि काय परिस्थिती आहे, याची कल्पना सध्या तरी बाहेर कोणालाही नाही.

टॅग्स :Accidentअपघातfireआग