शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ई-केवायसी आवश्यक, अन्यथा नोव्हेंबरपासून होणार रेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:16 IST

Bhandara : स्वस्त धान्यासाठी पडताळणीची ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे. जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थीचा शोध ई- केवायसीतून घेतला जाईल. तसेच बोगस लाभार्थीना चपराक बसेल. थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर स्वस्त धान्य वाटप १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

थम्ब व्हेरिफिकेशनला अवघे काही दिवस उरले असल्याने रेशन कार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य मिळवण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, ज्या शिधापत्रिकाधारकांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे विनामूल्य मिळणारे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

प्रत्येक लाभार्थीला आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रणेमध्ये आपला आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदांची ही प्रक्रिया असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.

स्थलांतरित कुटुंबालादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई- केवायसी करावी लागेल. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ही प्रक्रिया सुरू असून, शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे.

वेळेपूर्वीच आपली ई-केवायसी करून घ्या शिधापत्रिकेत नावे समाविष्ट असलेल्या कुटुंबीयांनी वेळेपूर्वीच आपली ई- केवायसी करून घ्यावी. तसेच भविष्यात आपले ई-केवायसीअभावी कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराgovernment schemeसरकारी योजना