लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ अंतर्गत देशातील सर्व आयुध कारखान्यासमोर नविन पेंशन योजना रद्द करुन जुनीच पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येथील आयुध कर्मचारी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून कर्मचाऱ्यांची एकजूटता दिसून आली.याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मुख्य महाप्रबंधक यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यात मजदूर संघटनेचे राष्ट्रीय नेता देवेंद्र लिल्हारे यांनी निवेदनातून २००४ पासून नवीन पेंशन योजना ही कामगार विरोधी आहे. त्यामुळे येत्या काळात अडचण निर्माण होणार आहे. याचा आतापासूनच परिणाम जाणवू लागला आहे. जुन्या धर्तीवर देण्यात आलेली पेंशन योजना पुन्हा बहाल करण्यात यावे, नविन पेंशन योजना बंद करावी, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार, असाा निर्वाणीचा इशारा आयुध कर्मचारी संघाने निवेदनातून दिला आहे.म्हटले.धरणे आंदोलनाता जिल्हा बीएमएस नेता राजेश बिसेन, अध्यक्ष योगेश झंझाड, महामंत्री श्रीकांत इंगले, सदस्य पंकज साकुरे, जेसीएम सदस्य निरज चौधरी, पंकज राहांगडाले, दिनेश ठवकर, रवी चतुभुर्ज, चंदन कुशवाहा, चंदू हटवार, आबिद शेख, राजाराम कुलदीप खोब्रागडे, दिपक डोलारे, शरद बांते, दिपक शिंगाडे, कामराज शहारे, रवी कुंडू यांच्यासह आयुध निार्माणीतील कर्मचारी उपस्थित होते. सांयकाळी धरणे आंदोलनाचे रुपांतर सभेत झाले. आयुध निर्माणी प्रवेशव्दारासमोर एक दिवशी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील घोषीत होणाºया तारखेत सर्व कर्मचाºयांनी सहकार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
आयुध निर्माणीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:58 IST
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ अंतर्गत देशातील सर्व आयुध कारखान्यासमोर नविन पेंशन योजना रद्द करुन जुनीच पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येथील आयुध कर्मचारी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून कर्मचाऱ्यांची एकजूटता दिसून आली.
आयुध निर्माणीत धरणे
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची एकजुटता : जुनीच पेंशन योजना सुरु ठेवण्याची मागणी