शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल ; भंडारा बनले खड्डेमय शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:08 IST

डांबर उखडले : लाखो रुपयांची उधळपट्टी गेली पाण्यात, भुर्दंड कुणाला?

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील खड्ड्यांचा विषय नवीन नसला तरी गत दोन दिवसांपासून आलेल्या दमदार पावसामुळे भंडाऱ्यातील रस्त्यांचे बेहाल झाले आहे. एकीकडे कोट्यवधींचा निधी आणून सिमेंट रस्ते बनविण्याचा सपाटा सुरू असताना डांबरी रस्ते मात्र पावसामुळे उखडले आहेत.

भंडारा शहराची लोकसंख्या लक्षात घेता, वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराचा जसजसा विस्तार वाढत गेला, तसतशी रस्त्यांचीही संख्या वाढत गेली. आजही भंडारा शहराला लागून असलेल्या आऊटर कॉलनीमधील रस्त्यांची दैनावस्था आहे. म्हाडा नगर असो की तकिया वॉर्ड परिसरातील भाग, येथे कच्चे रस्ते हमखासपणे दिसतात.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात आल्यावर हे मुख्यालय आहे की खड्डेमय शहर, असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो. पंधरवड्यापूर्वी मुस्लिम लायब्ररी चौक ते कॉलेज मार्गापर्यंतचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, २०० मीटर हाकेच्या अंतरावर असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील खड्डे मात्र स्थानिक प्रशासनाला दिसले नाहीत. ते खड्डे जीवघेणे होते म्हणूनच डागडुजी करण्यात आली, असा युक्तिवाद सुद्धा चांगलाच रंगला होता. रस्त्यावरील राजकारण रंगले असतानाच शुक्रवारी रात्रीपासून आलेल्या दमदार पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची पुन्हा पोलखोल केली.

दीड वर्षात उखडला रस्ताजिल्हा सामान्य रुग्णालय ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे दीड वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले होते. जवळपास ६० लाख रुपये या रस्त्यावर खर्च झाले होते. मात्र, दीड वर्षातच या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. अशीच अवस्था अन्य रस्त्यांचीही आहे. शहरात चांगल्या सिमेंटच्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. तर दुसरीकडे उखडलेल्या डांबरी रस्त्यांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सदर रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही, असे बोलून चेंडू टोलविला जात आहे.

या रस्त्यांची स्थिती दयनीयभंडारा शहरातील अत्यंत रहदारीचा असलेल्या मिस्किन टैंक ते महात्मा गांधी चौक रस्ता, जिल्हा सामान्य रुग्णालय चौक ते ग्रामसेवक कॉलनीकडे जाणारा रस्ता, बीटीबीसमोरील मार्ग, संताजी कार्यालय ते खाम- तलावकडे जाणारा मार्ग, खामतलाव ते शास्त्रीनगर वॉर्ड, देशबंधू वॉर्ड ते बजरंग चौकाकडे जाणारा मार्ग, राजीव गांधी चौक ते नागपूर नाका मार्ग, राम मंदिर वॉर्डातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. 

टॅग्स :bhandara-acभंडाराroad safetyरस्ते सुरक्षा