शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 24, 2015 00:37 IST

३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटुंबियांना आधारवड असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर यंदा अपुरे पाऊस आणि नियोजनअभावी दुष्काळाचे सावट आहे.

देखभाल दुरूस्ती अडली : टाकीचा उपसा नाही, नदी पात्रात पाण्याचा ठणठणाट, नियोजन अभावी शेतकरी संकटातरंजित चिंचखेडे चुल्हाड /सिहोरा३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटुंबियांना आधारवड असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर यंदा अपुरे पाऊस आणि नियोजनअभावी दुष्काळाचे सावट आहे. यामुळे १४ हजार हेक्टर आर शेती सिंचनापासून वंचित ठेवण्याचे संकट उभे झाले आहे.या शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजीव सागर धरणाचे पाणी बावनथडी नदी पात्रात सोडण्याचे नियोजन शासन आणि प्रशासनाकडे नाही, अशी माहिती मिळाली आहे. बावनथडी नदीवर सिहोरा परिसरात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे उपसा करण्यात आलेले पाणी विस्तीर्ण चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. पावसाळापुर्वी जलाशयात २० टक्के पाणी राखून ठेवण्यात येत असताना यंदा जलाशयाची जीर्ण दरवाजा दुरूस्ती करताना पाटबंधारे विभागाने मार्च महिन्यात जलाशयातील पाणी निरंक केलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाऊस नसतानाही धानाची नर्सरी वाचविण्यासाठी पाणी मिळाले नाही. पाणी नसल्याने धानाची नर्सरी अडचणीत आली आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओठवले आहे. दरम्यान नियोजन अभावी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प संकटात अडकला आहे. या प्रकल्पाचे नियंत्रण तिरोडा येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यालयातून होत आहे. प्रकल्पाच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. परंतु मध्यंतरी आलेल्या पावसाचे पाणी टाकीत शिरल्याने यंदा टाकीतील गाळ काढता येणार नाही. याशिवाय प्रकल्पात ९ पंपगृह आहेत. संपूर्ण पंपगृहाचा नदी पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी उपयोग करण्यात आलेला नाही. केवळ ४ पंपगृह सुरू केली जात आहे. परंतु या पंपगृहाची देखभाल आणि दुरूस्ती अडली आहे. निधीअभावी या प्रकल्पस्थळात ठिक ठाक नाही, अशी माहिती मिळाली आहे.हा प्रकल्प मागील आठ वर्षापासून अनेक उतार चढाव अनुभवत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियंत्रणात हा प्रकल्प आहे. पाणी वाटप करताना पाणीपट्टी करांची रक्कम शेतकरी लघु पाटबंधारे विभागाकडे जमा करीत आहेत. प्रकल्पाची देखभाल आणि दुरूस्ती तिरोडा उपसा सिंचन योजना यांचे नियंत्रणात होत आहे. या प्रकल्पात हस्तांतरणाचा वाद आहे.प्रकल्पस्थळात २ आॅपरेटर व ३ सुरक्षा गार्ड आहे. ११० कोटींचा प्रकल्प अल्प सुरक्षा रक्षकांच्या नियंत्रणात आहे. प्रत्यक्षात ९ सुरक्षा गार्डाची गरज आहे. परंतु यात कात्री लावण्यात आली आहे. दरम्यान ३ सुरक्षा गार्डाचे गेल्या ४ महिन्यापासून वेतन प्राप्त झाले नाही. यंदा प्रकल्पात नियमित पाण्याचा उपसा होणार किंवा नाही हे आता सध्यातरी संशयास्पद आहे. गेल्यावर्षी १ आॅगस्टला पंपगृह सुरू करण्यात आले होते. तर ५६ दिवसनंतर २५ सप्टेंबर रोजी हा बंद करण्यात आले होते. यामुळे ३६ फुट पाण्याची साठवणूक जलाशयात झाली होती तर १० हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आली होती. परंतु यंदा तसे चित्र या प्रकल्पस्थळात नाही. ही प्रकल्पनदी पात्रातून पाण्यावा उपसा करण्यास सज्ज असून पावसाची प्रतिक्षा असल्याची माहिती प्रकल्प स्थळातील आपरेटर यांनी दिली.