शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

सिहोरा परिसरात भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: April 21, 2016 00:30 IST

दोन नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात नद्या, तलाव, बोडी, नाले पूर्णत: आटल्याने येत्या मे महिन्यात....

बावनथडी नदीचे पात्र कोरडे : वैनगंगेच्या काठावरील गावात चांगभलं, गावात विहिरींची पातळी खोलवरचुल्हाड (सिहोरा) : दोन नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात नद्या, तलाव, बोडी, नाले पूर्णत: आटल्याने येत्या मे महिन्यात भीषण टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यापासून गावात पाणी टंचाईची झड पोहचण्यास सुरुवात झाली आहे.गत वर्षात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अल्प झाले होते. समाधानकारक पाऊस झाल्याची नोंद शासन दरबारात नाही. यामुळे तलाव, बोडी मध्ये अपेक्षित प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली नाहाी. या कालावधीत बावनथडी नदीच्या पाण्याने पात्राने पुरांची पातळी ओलांडली नाही. असे असतानाही जिल्हा प्रशासन तथा राज्य शासनाने गंभीरतेने घेतले नही. दुरदृष्टी ठेवून उन्हाळ्याचे नियोजन करण्यात आले नाही. या परिसरात जागोजागी नाल्यावर सिमेंट प्लग बांधकाम करण्यात आली आहे. लघु पाटबंधारे विभाग, हरियाली योजनेतून कोट्यावधी रुपयाची नासाडी करण्यात आली आहे. परंतु या बंधाऱ्यात मार्च महिन्यापासून पाणीच नाही. संपूर्ण बंधारे कोरडे पडली आहे. या बंधाऱ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नसताना यंत्रणा व कंत्राटदाराचे चांगलेच फावले आहे. या परिसरात बावनथडी नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. अनेक वर्षाची परंपरा या नदीच्या पात्राने यंदाही जोपासली आहे. नदीच्या काठावरील गावात असणाऱ्या नळ योजना प्रभावित झालेल्या आहेत. खुद्द शेकडो शेतकऱ्यांना तारणाऱ्या सोंड्याटोला प्रकल्पात कार्यरत सुरक्षा रक्षकांना पिण्याचे पाणी घरून आणावे लागत आहे. गावागावात नळ योजना मंजूर झाल्याने असणारे हातपंप दुर्लक्षित करण्यात आले आहे. परंतु नळयोजनांना बंद पडताच तहान भागविणाऱ्या या हातपंपाची आठवण ताजी झाली आहे. बावनथडी नदी पात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्याची ओरड सुरु झाली आहे. या नदीपात्राचे लगत गावात जनावरांनाही पिण्याचे पाणी प्राप्त होत नसल्याची बोंब आहे.सिहोरा परिसरातील मध्य भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करणारे पर्याय नाहीत. या गावात नळयोजना विहिरीवर आहेत. या वििहरीची खोलीकरणाची पातळी ५०-६० फुट आहे. परंतु गावात शेतकऱ्यांनी या पेक्षा अधिक खोलवर बोअरवेल्स खोदकाम केली आहे. यामुळे गावात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.असे असताना बेधडक शासकीय कामांना मंजूरी देण्यात आली आहे. पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध नसताना शासकीय प्रस्तावित बांधकामांना स्थगिती देण्यात आली नाही. या कालावधीत आघाडी शासनाने स्थगीती दिली होती. प्रशासनाने नियोजन लांबणीवर ्नटाकल्याने गावात आता मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची पाळी येणार आहे.नळ योजनांना थकीत विजेचे देयकासाठी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या योजनांना १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदान राशीने तारले आहे. उसनवारीचे भूत ग्रामपंचायतीमध्ये शिरले आहे. १४ व्या वित्त आयोगाने पाणी पुरवठ्याला उसणवारीत राशी दिली आहे. तब्बल महिनाभरानंतर नागरिकांना पाणी मिळाले आहे. योजनेचे पाणी प्राप्त होत असताना सूर्याने आग ओकली असल्याने पाणी पुरवठा करणारे पंपगृह दुष्काळा पोहचली आहेत. एक गुंड पाणी आता घरातील सदस्यांची तहान भागविणार आहे. याच परिसरात असणाऱ्या वैनगंगा नदी काठावरील गावात तथा या काळापासून १० कि.मी. अंतरावरील गावात चांगभलं असल्याचे चित्र आहे. नदीवरील धरणात पाणी अडविण्यात आल्याने निश्चितच पाण्याची पातळी वाढली आहे. या नदीवरील नळ योजनाचे पंपगृह पाण्याचा उपसा करीत आहोत. धरणाने नागरिकांना तारले आहे. उन्हाळ्यात नागरिकांना धरणाने नवसंजीवनी आणली आहे. परंतु अन्य गावात पाणी टंचाईचे संकट ओढावणार असल्याचे चित्र असताना लोकप्रतिनिधीसह प्रशासनाने अद्याप ठोस पाऊल उचलले नाही, ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)