शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकडे दुर्लक्षामुळे आरोग्यावर वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:53 IST

कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे.

ठळक मुद्देभाष्कर टिचकुले : पटेल महाविद्यालयात समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रतिपादन भाष्कर टीचकुले (दुबई) यांनी केले.स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे आयोजत विकसनशील यांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील स्वास्थ्य व सुरक्षितता विषयक जाणीव या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगीमंचावर डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. दिपक राऊत, डॉ. राहुल मानकर उपस्थित होते.टीचकुले म्हणाले की , आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेनुसार जगात कामाच्या ठिकाणी ३ लाख ३५ हजार अपघात होतात त्यापैकी १ लाख ७० हजार कृषीक्षेत्रात मृत्युचे प्रमाण आहे.यासंदर्भात त्यांनी विस्तृत आकडेवारी प्रस्तुत करून शेतकºयांची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी व त्यामध्ये जाणीव- जागृती निर्माण होण्यासाठी शासनाद्वारे आणि शेतकºयांच्या सामाजिक संघटनांद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान त्यांनी केले. भारतातील शेती प्रश्नांची चर्चा करताना ते म्हणाले की विकसनशील देशात शेतीतील अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात २६३ मिलीयन लोक शेतीवर अवलंबून आहेत, यापैकी स्त्रियांच्या वाटा ३७ टक्के आहे.शेती प्रक्रियेतउपयोगात आणल्या जाणाºया ट्रॅक्टर, थ्रेशर मशिन, खते व किटकनाशकांमुळे शेतकºयांना बहिरेपणा, दमा, विषबाधा, कॅन्सर सारखे आजार होतात आणि अनेकदा मृत्यू घडून येतात.या क्षेत्रातील अपघातांची शासकीय स्तरांवर कोठेही नोंद होत नाही. कृषी-यंत्र आणि उत्पादक आणि कीटकनाशक विक्रेते शेतकºयांनाही योग्य माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे आता शासकीय स्तरावर सुरक्षितता प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.प्रास्ताविक गणेश खडसे यांनी तर संचालन विक्की राऊत व तितीक्षा रंगारी यांनी केले. विवेक मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गायत्री हिरापुरे, समीर कावरे, सुशुप्ती काळबांडे, कौतुक मेश्राम, अमिता राऊत, निखद शेख, आयुषी गजापुरे, गौरी ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.