शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

निधीअभावी शेततळ्याची योजना कागदोपत्रीच बंदिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

२०१७ व २०१८ या आर्थिक वर्षात खोलीकरणाकरिता सुरुवात झाली. २०१९ व २०२० पर्यंत हे शेततळे तयार करण्याचे काम सुरू होते. यानंतर शासनाकडून निधीच आला नाही. यामध्ये तीन शेततळी पूर्ण होऊनही त्यांचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. शेततळी किती मोठी बांधायची, कशी व कुठे बांधायची, याचा संपूर्ण अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

संतोष कोरेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पावसाने पीक गेले, मेहनत व पैसेही बुडाले, असे म्हणायची वेळ येऊ नये, याकरिता शेततळे बनविण्यासाठी शासनाने दोन वर्षांपासून निधीच दिला नाही. पाण्याची खालावलेली पातळी व लहरीपणामुळे साकोली तालुक्यात एकूण ६९ शेततळी खोदली गेली. यापैकी तीन शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असतानाही निधीचा थांगपत्ता नाही.२०१७ व २०१८ या आर्थिक वर्षात खोलीकरणाकरिता सुरुवात झाली. २०१९ व २०२० पर्यंत हे शेततळे तयार करण्याचे काम सुरू होते. यानंतर शासनाकडून निधीच आला नाही. यामध्ये तीन शेततळी पूर्ण होऊनही त्यांचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. शेततळी किती मोठी बांधायची, कशी व कुठे बांधायची, याचा संपूर्ण अधिकार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. या शेततळ्यांचा वापर पावसाळ्यानंतर रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी होतो. पावसाळ्यानंतर किमान तीन महिने हे पाणी वापरता येते. यामुळे पावसाच्या लहरीपणावर मात करून शेतकऱ्यांना रब्बी व खरीप अशी दोन पिके सहज घेता येतील. केंद्र शासनाची ही योजना राज्य शासनाने प्रत्यक्ष आणणे बंधनकारक आहे; परंतु राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षांपासून निधी प्राप्त न झाल्याने ही योजना कागदोपत्री गुंडाळली गेली आहे. शेतकऱ्यांना शेततळे खोदताना त्यांच्या मर्जीनुसार आकारमान घनमीटरमध्ये १५ बाय १५ व  ३ मीटर खोल  ते  ३० बाय ३० व ३ मीटर खोल अशाप्रकारे शेततळे तयार करायचे असते. 

५० हजारांपर्यंत खर्च अपेक्षित- शेततळे तयार करण्याकरिता २२ हजार ते ५० हजार खर्च करणे अपेक्षित आहे. शेततळे तयार झाल्यानंतर शेतकऱ्याला खरीप व रब्बी हंगामात सिंचनाची सोय व मत्स्य पालन करून हजारो रुपयांची आर्थिक मदत होऊ शकते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे साकोली तालुक्यात मागील तीन वर्षांत ६९ शेततळे खोदण्यात आली. आजच्या परिस्थितीमध्ये निधी नसल्याने शेततळे तयार करण्याचे काम पूर्णत: बंद आहे. 

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प