अपुऱ्या पावसाने दुष्काळाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:20 PM2018-10-22T22:20:00+5:302018-10-22T22:20:19+5:30

करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले.

Due to inadequate rainfall, drought hit | अपुऱ्या पावसाने दुष्काळाचा चटका

अपुऱ्या पावसाने दुष्काळाचा चटका

Next
ठळक मुद्देधानपीक हातचे गेले : मदतीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले. त्यातच १६ तासाचे भारनियमन, कीड व रोगांचे आक्रमण, जंगल परिसरात वन्यजीवांचा हौदोस यासर्व कारणांमुळे शेतकरी वैतागला आहे. आता दुष्काळाचे सर्व्हेक्षण करण्यास शासनाने पुढाकार घेतला असला तरी मागील अनेक अनुभवाप्रमाणे यावेळीही शेतकऱ्यांना न्याय व मदत मिळणार काय, असा प्रश्न आहे.
करडी परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धान पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहाडी तालुक्यातील पांजरा, मोहगाव देवी व आंधळगाव येथील धान पिकाची पाहणी केली. परंतु दुष्काळाचा फटका बसलेल्या करडी परिसराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या पाहणीत त्यांनी धान उत्पादक शेतकºयांच्या शेतीचा सविस्तर सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकºयांना लाभ मिळाला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्ष काय लाभ दिला जाणार, याकडेही शेतकºयांचे लक्ष लागून आहेत.
टेलवरील शेती दुर्देवी
यावर्षी रिसाळा जलाशयात पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळेही सिंचनाची सुविधा असलेल्या भागात पाणी पोहचविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यातच पाणी वितरणातील प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळेही टेलवर पाणी पोहचले नाही. करडी परिसरात कोरडा दुष्काळ पडला. धान गर्भावस्थेत असताना व अधिक सिंचनाची गरज असताना भारनियमनाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले. भेगा पडलेल्या शेतीला आठ तासात सिंचनाच्या सुविधा देताना धावपळ झाली. वारंवार खंडीत होणारे भारनियमन यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत त्यानाही पिकाला पाणी देता आले नाही. शेतकºयांवर आपत्तीची कुऱ्हाडच कोसळली.

Web Title: Due to inadequate rainfall, drought hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.