शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

धान खरेदी केंद्रावर धानाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:44 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले.

ठळक मुद्देयावर्षी अर्ध्यावरच धान खरेदी : १५ दिवस लोटूनही धानाचे पैसे मिळाले नाही

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले. त्यामुळे यावर्षी उत्पादनात कमालीची घट दिसून आली.साकोली धानखरेदी केंद्रावर मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची आवक निम्म्यावर आली आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन्यातच शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. मात्र धानच नसल्याने सुरुवातीचे आठ दिवस तर धानाची आवक झाली नाही. त्यानंतरही धानाची आवक नाहीच्या बरोबर आहे. साकोलीच्या धान खरेदी केंद्रावर कालपर्यंत ३ हजार ५९८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. तर मागील वर्षी याच महिन्यात ५ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. विर्शी धान खरेदी केंद्रावर कालपर्यंत फक्त ७५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले तर मागील वर्षी याच महिन्यात खरेदी ही २ हजार क्विंटल धानाची होती. या आकडेवारीवरुन मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची धानाची आवक ही निम्म्यावरच आहे. त्यामुळे शेतकºयाची आर्थिक स्थिती अडचणीत सापडली आहे.तुडतुडा व मावा किडीने केला कहरयावर्षी धानपिकावर तुडतुड्याने आक्रमण केले. शेतकºयांनी विविध औषधी फवारणी केली. मात्र तुडतुड्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधी कुचकामी ठरली. मात्र या संकटसमयी कृषीविभाग अपयशी ठरला. त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना कामात आल्या नाही.केंद्राचे गोदाम भाडे थकितसाकोली येथील धान खरेदी केंद्राचे २०१० पासूनचे २०.५१ लाख रुपये गोदाम भाडे थकित आहेत. धान खरेदी केंद्राचे सन २०१५-१६ व २०१६-१७ चे धान खरेदीचे ३३.४० लाख रुपये कमीशनही थकित आहे. एकीकडे शासन शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेतात व दुसरीकडे शेतकºयांना अडचणीत आणते.