भुयार : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सातत्याने भाव घसरत असल्याने धान खरेदीबाबत व्यापारीही उदासीन दिसत आहे.पवनी तालुका पूर्णत: कृषीप्रधान आहे. या तालुक्याची बहुतांश संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. जून जुलै महिन्यात लागवड केलेल्या धानाची फसल साधारणत: नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच् या हातात येते. पीक हातात आल्यानंतर शेतकरी आपले वर्षभराचे नियोजन करून उर्वरीत धान विक्रीसाठी काढत असतो. गेल्या दोन तीन वर्षात धानाचे भाव बऱ्यापैकी वाढले होते. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत होते. पण यावर्षी धानाच्या भावाने एकदम निच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. मागील वर्षी जय श्रीराम, डी.आर.के., परभणी व उच्च प्रतीच्या धानाचे भाव दोन हजार ६०० ते २ हजार ७०० रुपये या दरम्यान होते. याच धानाचे भाव या वर्षी दोन हजार रुपयाच्या आत आहेत. मागील वर्षी एचएमटी ने दोन हजार रुपयांची मर्यादा ओलांडली होती. तीच एचएमटी यावर्षी एक हजार ६०० रुपयांवर थांबली आहे. धानाच्या भावाबाबत अशी परिस्थिती असल्याने धान उत्पादक शेतकरी भांबावून गेला आहे. धानाला योग्य भाव मिळत नसल्याने कसे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शेतकरीच नाही तर व्यापारीही दचकून गेले आहेत. (वार्ताहर)\
धानाचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल
By admin | Updated: March 6, 2015 00:59 IST