शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

'तो' डबा महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:30 IST

महिनाभरापासून दूध उत्पादकावर होणार अन्याय अखेर शुक्रवारपासून दूर झाला. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडणी करण्यात आल्याने ......

ठळक मुद्देदूध उत्पादकांमध्ये आनंद : शिशुपाल पटले यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महिनाभरापासून दूध उत्पादकावर होणार अन्याय अखेर शुक्रवारपासून दूर झाला. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडणी करण्यात आल्याने दुग्ध उत्पादकांमध्ये आंनद व्यक्त केला जात आहे.भंडारा आणि गोंदिया या दूध उत्पादक जिल्ह्यांतील किमान ५०० दूध उत्पादक शेतकरी दररोज सकाळी नागपूरला दूध वाहतूक करण्याकरिता महाराष्ट्र एक्स्प्रेस चा उपयोग करतात. नागपूरला मागणी आणि दर जास्त असल्याने शेतकरी वर्गाकरिता हा जोडधंदा ठरत आला आहे. त्यांना रेल्वे वाहतुकी दरम्यान वाईट वागणूक आणि आर्थिक पिळवणुकीचा सामना करावा लागत होता. त्याकरिता तत्कालीन लोकसभा सदस्य शिशुपाल पटले यांनी १२ वर्षांपूर्वी रेल्वे मंत्री आणि उच्च अधिकारी यांचेशी सतत पाठपुरावा करून दूध उत्पादक शेतकरी यांना या मूलभूत समस्येवर मोठा दिलासा मिळवून दिला होता. त्यांच्याच प्रयत्नांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमधून खास दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा मिळाला होता. शिवाय, आर्थिक पिळवणूक आणि अन्यायाची वागणूक देखील बंद झाली होती. मात्र, २००५ पासून सुरु असलेला विशेष डबा अचानक महिन्याभरापासून कुठलीही पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आला. इतकेच नव्हे तर दुग्ध परिवहनाला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया येथील दूध उत्पादक क्षेत्राला फटका बसला. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला.याविरोधात, दूध उत्पादक किसान संघटनेकडून माजी खासदार शिशुपाल पटले यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यावर पटले यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच न्याय न मिळाल्यास पटले यांनी दूध उत्पादक शेतकºयांसोबत आंदोलनाची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, त्यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री गोयल यांना भेटून आणि मुंबई येथे उच्च अधिकाºयांना भेटून तात्काळ अन्याय दूर करण्यात यश मिळवले.