शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असताना आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

भंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असताना आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेत सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची शंका वर्तविली जात आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर सोडू नका, त्यांची विशेष काळजी घ्या, लक्षणे आढळल्यास तात्काळ टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन शहरातील बालरोग तज्ज्ञांनी केले आहे.

भंडारा जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आले. त्यात सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. मृतांचे प्रमाणही वाढले होते. आता दुसरी लाट ओसरु लागली असून लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतरही मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका. काही कामानिमित्त बाहेर गेल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेेचे आहे. कारण लहान मुलांना कोरोना झाल्यास त्याच्यासोबत घरातील कुणालातरी रुग्णालयात राहावे लागेल आणि त्यातून पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षण काय?

मोठ्यांमध्ये आढळलेली कोरोनाची लक्षणे साधारणपणे लहान मुलांमध्येही आढळून येणार आहेत.

सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून येणार आहेत.

तीव्र कोरोना लक्षणांमध्ये छातीतून घरघर आवाज येऊन बाळ सुस्त राहण्याची शक्यता आहे. तसेच ऑक्सिजनची मात्र कमी झाल्यास ओठ निळसर पडू शकतात.

बाल रुग्णांसाठी २० खाटांचे डेडीकेट केअर युनिट

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सकांसह शहरातील बालरोग तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष वाॅर्ड तयार करण्यात आले आहे. आता संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता २० खाटांचे डेटीकेड केअर युनिट लवकरच उभारले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निखिल डोकरीमारे यांनी दिली.

कोरोनाचा धोका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. त्यामुळे मोठ्यांनी तातडीने लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी २० खाटांचा विशेष वाॅर्ड तयार करण्यात येणार आहे.

-डाॅ.निखिल डोकरीमारे,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास तात्काळ टेस्ट करुन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना गर्दीत घेऊन जाऊ नये. घरात कुणी कोरोनाबाधित असेल तर त्याला लहान मुलांपासून दूर ठेवावे. विशेष करुन आईने ही काळजी घ्यावी.

-डाॅ.सुनील जिभकाटे, बालरोग तज्ज्ञ

संभाव्य तिसऱ्या लाटेपर्यंत १८ वर्षावरील बहुतांश व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल. तर १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण होणार नाही. त्यामुळे या वयोगटातील बाळांना कोरोनाचा अधिक धोका संभावतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

-डाॅ.शशांक क्षीरसागर, बालरोग तज्ज्ञ

शक्यतो लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. व्हिटॅमिन सी, डी अथवा व्हिटॅमिन बी काॅम्प्लेक्स सायरप द्यायला हरकत नाही. फिजीकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा वापर करुन बालकांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

-डाॅ. अमित कावळे, बालरोग तज्ज्ञ