शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करु नये

By admin | Updated: February 7, 2015 00:21 IST

जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थिती असताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली व जप्ती करु नये, ...

भंडारा : जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थिती असताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली व जप्ती करु नये, यासाठी उपनिबंधकांनी सर्व बँकाना लेखी निर्देश द्यावेत, असे स्पष्ट आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार व चरण वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे, निमंत्रित सदस्य आशा गायधने, भरत खंडाईत, अरविंद भालाधरे, संजय गाढवे उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ करिता सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदवासी उपयोजना क्षेत्रबाह्य या तीन विकास क्षेत्र मिळून १२२ कोटी ५८ लाख ४० हजार रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्याला मान्यता दिली. यामध्ये यंत्रणाकडून २३८ कोटी ९५ लाख रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून शासनाने ठरविलेल्या कमाल मर्यादेपेक्षा ११६ कोटी ३६ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा निधी समाजातील दुर्लक्षित आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे, कामाचे नियोजन करतांना पहिल्या तीन महिन्यात आराखडा तयार करुन उर्वरित कालावधीत त्याची अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसोबत दरडोई उत्पन्न वाढेल अशा बाबींचा समावेश आराखड्यात करावा, असे निर्देश त्यांनी दिले.सर्वसाधारण योजनेसाठी ७०.२७ कोटी सर्वसाधारण योजनेसाठी ७० कोटी २७ लाख, अनुसूचित जाती उपाययोजना २९ कोटी ४७ लाख आणि आदिवासी उपाययोजना १२ कोटी ८४ लाख रुपये निर्धारित केले आहेत. सर्वसाधारण योजनेंतर्गत १६७ कोटी ६४ लाख रुपयांचे प्रस्ताव कार्यवाही यंत्रणांकडून प्राप्त झाले. मात्र ७० कोटी २७ लाख रुपयांची मर्यादा असल्यामुळे ९९ कोटी ३७ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी आहे. अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये ३९ कोटी ४७ लाख रुपयांचा प्राप्त प्रस्ताव कमाल मर्यादेत असल्यामुळे सर्व प्रस्ताव मान्य करण्यात आले. आदिवासी उपयोजनामध्ये २९ कोटी ८३ लक्ष ४२ हजार रुपयांपैकी १२ कोटी ८४ लक्ष रुपयांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले असून १६ कोटी ९९ लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविण्यात आली आहे.कृषी योजनेसाठी १०.६४ कोटीकृषी व सलग्नसेवा १० कोटी ६४ लक्ष ४७ हजार, ग्रामीण विकासासाठी विशेष कार्यक्रम ४ कोटी ३४ लाख २७ हजार, सामाजिक सेवा २९ कोटी ५२ लाख २६ हजार, ऊर्जा विकास १ कोटी, ग्रामीण व लघु उद्योग ५१ लाख ४० हजार, परिवहन १३ कोटी ९८ लाख ३९ हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण ३ कोटी १७ लाख १ हजार, सामान्य आर्थिक सेवा ३ कोटी ५८ लक्ष २० हजार, नाविन्यपूर्ण योजना २ कोटी ४६ लाख तसेच इतर योजनेत १ कोटी ५ लाख असा एकूण ७० कोटी २७ लाख रुपयांचा आराखडाला आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)