शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

दिव्या बनली त्या गावातील मुलांची सावित्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

ही आधुनिक सावित्री आहे मोहाडी तालुक्यातील नरसिंहटोला या खेड्यातील. तिचं नाव आहे दिव्या अय्यर, बी.कॉम.पर्यंत शिकलेली व संगणकाचे ज्ञान असलेली गरीब मुलगी आहे. तिची आई स्वर्गीय पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला या शाळेत आहार शिजवायला जायची. या मुलीला गावातील वास्तव परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे कोविड-१९ ने शिक्षणात अनेक अडथळे निर्माण केले आहेत.

ठळक मुद्देदोन तास अध्यापन : संधीच केलं सोन, कोरोना संकटकाळात मिळाला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. पण खेड्यातील मुलांपर्यत ऑनलाईन शिक्षण पोहचतच नाही. तथापि, नरसिंहटोला येथील एक शिक्षित तरुण मुलगी सावित्री बनली. तिने गावातील मुला- मुलींना आर्थिक लाभाची आस न करता अध्यापन सुरू केले आहे.ही आधुनिक सावित्री आहे मोहाडी तालुक्यातील नरसिंहटोला या खेड्यातील. तिचं नाव आहे दिव्या अय्यर, बी.कॉम.पर्यंत शिकलेली व संगणकाचे ज्ञान असलेली गरीब मुलगी आहे. तिची आई स्वर्गीय पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला या शाळेत आहार शिजवायला जायची.या मुलीला गावातील वास्तव परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे कोविड-१९ ने शिक्षणात अनेक अडथळे निर्माण केले आहेत. नवीन शैक्षणिक सत्राला शाळा कधी सुरू होईल याबाबत कोणीही सांगूच शकत नाही. शाळा बंद पण शिक्षण सुरू हा शिक्षण विभागाचा उपक्रम सुरू आहे. पण, पालकांकडे स्मार्ट फोन नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून खेड्यातील अनेक मुलं, मुली वंचित आहेत.गावातील मुलं रिकामी फिरतात. मनसोक्त खेळतात. पण, अभ्यासापासून ही मुलं खूप लांब जात असल्याचे दिव्या बघत होती. पण, या धाकधूकीच्या वातावरणात ती संधी शोधत होती. चार दिवसांपूर्वी गट साधन समूह पंचायत समितीकडून विना मानधनावर मुलांना अध्यापन करणाऱ्या स्वयंसेवकांनी लिंक भरायची होती. मुख्याध्यापिका सुनीता तोडकर यांनी त्या दिव्या सोबत संपर्क केला. सगळी वास्तविक माहिती दिली.अलीकडे शिकवण्या व्यवसाय असताना मोफत शिकवायच म्हटलं तर नाक मुरड नारी अनेक भेटतील. पण ती म्हणाली, ताई, मी माझ्या गावातील मुलांना शिकवायला तयार आहे. मला काही नको. ती दिव्या विना मानधन शिक्षण द्यायला प्रेरित झाली. लगेच तिने दुसऱ्या दिवशीपासून पहिली ते सातवीच्या मुलांमुलींना चार दिवसापासून शिकवीत आहे. आता गावात फिरणारी मुलं दिव्याच्या घरी पुस्तक वह्या घेवून येत आहेत. या मुलांसाठी सावित्री बनलेली दिव्या अनेकांची प्रेरणास्थान बनली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या