शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
2
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
3
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
4
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
5
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
6
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
7
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
8
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
9
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
10
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
11
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
12
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
13
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
14
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
15
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
16
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
17
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
20
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स

जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

जिल्ह्यात सरासरी १३३० मिलीमीटर पाऊस बरसतो, असे गृहीत धरले जाते. मागील वर्षी म्हणजेच २०१८ च्या मान्सून सत्रात १ जून ते १० आॅक्टोबर पर्यंत सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस बरसला होता. मात्र यावर्षी याच तारखेपर्यंत एकुण १२८२ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद पवनी तालुक्यात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचांगल्या उत्पादनाची आशा : धानपिकावर कीडींचा प्रादूर्भाव कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी हुलकावणी देणाऱ्या वरुण राजाने मात्र यावर्षी जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या मान्सून सत्रात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे धानाला भरपूर पाण्याची गरज असल्यामुळे धानाचे चांगले उत्पादन होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यात सरासरी १३३० मिलीमीटर पाऊस बरसतो, असे गृहीत धरले जाते. मागील वर्षी म्हणजेच २०१८ च्या मान्सून सत्रात १ जून ते १० आॅक्टोबर पर्यंत सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस बरसला होता. मात्र यावर्षी याच तारखेपर्यंत एकुण १२८२ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद पवनी तालुक्यात करण्यात आली आहे.तालुकानिहाय बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ११२१ मिलीमीटर, मोहाडी तालुक्यात १०७६.७ मिलीमीटर, तुमसर तालुक्यात १०४६.५ मिलीमीटर, पवनी तालुक्यात १५४५.९ मिलीमीटर, साकोली तालुक्यात १२०० मिलीमीटर, लाखांदूर तालुक्यात १५०७ तर लाखनी तालुक्यात १४७६ मिलीमीटर पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्वांची एकुण सरासरी १२८२.१ मिलीमीटर अशी नोंद करण्यात आली आहे.यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्याची जीवनदायीनी नदी समजल्या जाणाऱ्या वैनगंगेला दोन वेळा पूर आला. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व वैनगंगेच्या नदीखोऱ्यात मुसळधार पावसामुळे धरणाची दारे उघडण्यात आली होती. परिणामी जिल्ह्यातील नदीकाठावरील ८२ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे जीर्ण इमारतीही कोसळल्याची घटना घडली. तर मोठ्या प्रमाणात घर तथा जनावरांचे गोठेही कोसळल्याची घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे या पुरात आठ जणांना जीव गमवावा लागला होता.किडीचे व्यवस्थापन आवश्यकजिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने धानपिकाचे चांगले उत्पादन होईल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र गत १५ दिवसांपासून धानपिकांवर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. परिणामी या किडीमुळे धानाचे उत्पादन घटणार तर नाही ना अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. तुडतुडा या रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करून या किडीवर योग्य व्यवस्थापन व नियंत्रण आणणे अतीआवश्यक झाले आहे. हलक्या धान कापणीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यातच पावसाने उसंत घेतल्याने किडीवर नियंत्रण करणे शक्य होऊ शकते. मात्र कृषी विभागामार्फत सबसीडीवर शेतकºयांना औषधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांची स्थिती नसतानाही कर्ज घेऊन महागडी औषध फवारणी करण्याचे संकट बळावले आहे. दुसरीकडे काही तालुक्यात कृषी अधिकाºयांनी बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचेही मोहीम हाती घेतली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती