शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मोहाडी तालुक्याला ‘जलयुक्त’चे जिल्हास्तरीय तीन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:14 IST

जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी तालुक्याची कामगिरी जिल्ह्यात सर्वाेत्तम राहिली.

ठळक मुद्देतालुक्याचा गौरव : अधिकारी- पदाधिकाºयांनी स्वीकारला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजनेत मोहाडी तालुक्याची कामगिरी जिल्ह्यात सर्वाेत्तम राहिली. परिणाम म्हणून तालुक्याला एकाचवेळी जिल्हास्तरीय तीन पुरस्कार अनुक्रमे प्रथम पिंपळगाव, द्वितीय करडी व तृतीय पुरस्कार नरसिंगटोला देव्हाडा गावांना मिळाला. मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. अधिकारी, सरपंच व ग्रामपदाधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तालुक्याच्या शिरपेचात माणाचा तुरा या पुरस्काराने रोवला गेला.मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजना लोक चळवळ झाली असून या योजनेतून मोठ्या प्रमाणात जलसाठ्यांचे पुनर्जीवन, बांधणी व साठवणे कामे करण्यात आली. पावसाचे प्रमाण कमी असतानाही जलयुक्त शिवार योजनेत अडविलेल्या साठविलेल्या पावसाच्या पाण्याच्या भरस्यावर शेतकºयांना भरघोष उत्पादन घेता आले. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात भर पडली. शिवाय पाण्याचा कामयचा स्त्रोत निर्माण झाला. मोहाडी तालुक्यात कृषी विभागाने मेहनत घेत मोठी कामे केली. अन्य विभागाने सुद्धा शासनाच्या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे शेतकºयांतील निराशावादी विचारसरणी दूर होण्यास मदत झाली.पाण्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व ताळेबंद ठेवण्याचे कसब शेतकºयांना आत्मसात करता आले. अन्य गावांना व शेतकºयांना यातून प्रेरणा मिळाली.वर्षा येथे ९ नोव्हेंबर रोजी नागपूर विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात मोहाडी तालुक्याला जिल्हास्तराचे तीन पुरस्कार मिळाले. प्रथम पुरस्कार पिंपळगाव, द्वितीय करडी तर तृतीय पुरस्कार नरसिंगटोला देव्हाडा बुज गावांना मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते वितरीत करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मोहाडी तालुका कृषी अधिकारी किशोर पाथ्रीकर, मंडळ कृषी अधिकारी राहूल गायकवाड, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, अरुण सार्वे, कृषी सहायक यादोराव बारापात्रे, देवेंद्र वाडीभस्मे, करडीचे सरपंच सिमा साठवणे, नरसिंगटोलाचे सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, सदस्य दुर्याेधन बोंदरे, सियाराम साठवणे, पिंपळगावचे सरपंच विक्रम जिभकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त गावातील सरपंच, पदाधिकारी तसेच अधिकाºयांचे जिल्हाधिकारी यांनी कौतूक केले.