इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.गहू पिकासह भाजीपाला पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवार दुपारपर्यंतच जिल्हा मुख्यालयाला अवकाळी पावसामुळे कुठलेही नुकसान झाले नाही, असा संदेश पाठविला. ‘हॉश-पॉश’ घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा असू शकतो. प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचे मौका पंचनामे करण्याची गरज आहे, परंतू तसे झालेले नाही. यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने उन्हाळी धानपीक घेऊ नये असा फतवा काढला होता, तरीही बहुतांश हेक्टरमध्ये उन्हाळी भाताची लागवड करण्यात आलेली आहे. दुसरीकडे रबी हंगामात ४७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रात रबी पिकाची पेरणी करण्यात आली आहे. वादळी वाºयासह पावसाचा मार या पिकांना बसला असताना काही तासांच्या पाहणीतच नुकसान शुन्य कसे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. रबी पिकांतर्गत गहू यासह कडधान्य अंतर्गत हरभरा, लाख, लाखोळी, पोपट, वाटाणा, उडीद, मुग, मसूर, चवळी, मोट व अन्य धान्याचा समावेश आहे.सातही तालुक्यातून प्राप्त माहितीनुसार वादळी वाºयासह बरसलेल्या पावसामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही.-डॉ. सुजाता गंधेउपजिल्हाधिकारी (महसूल), भंडारा
जिल्हा प्रशासन म्हणते, नुकसान शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:32 IST
रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे.
जिल्हा प्रशासन म्हणते, नुकसान शून्य
ठळक मुद्देफटका वादळी वाऱ्याचा : उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार