शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ तासात ७३.१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांचा वर्षाव झाला. या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्रीसुध्दा अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. दमट हवामानामुळे पीकांवर कीड येण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजना करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी केले आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस : महिनाभरात सहा वेळा फटका, धान उत्पादक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हावर नैसर्गिक संकटांचे ढग दूर व्हायचे नाव घेत नाही. महिनाभरात सहावेळा अवकाळी पावसाचा फटका बसला असून गत २४ तासात ७३.१ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी मंडळात ३७.६ मिमी नोंदला गेला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दिवाळीपासून जिल्ह्यावर नैसर्गिक संकट कोसळत आहे. ऐन काढणीला आलेला धान दिवाळीच्या काळात उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर १५ डिसेंबर ते ८ जानेवारी या महिनाभराच्या काळात जिल्ह्यात सा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. १५ डिसेंबर रोजी १० मिमी, २५ डिसेंबर रोजी १५ मिमी, २६ डिसेंबर रोजी ५ मिमी, ३१ डिसेंबर रोजी ६४.८ मिमी, १ जानेवारी रोजी १०.६ मिमी, २ जानेवारी रोजी ६६.६७ मिमी पावसाची नोंद झाली होती. आता अवकाळी पाऊस विश्रांती घेईल असे वाटत असतांना ७ जानेवारी रोजी पुन्हा अवकाळी पाऊस बरसला.गत २४ तासात जिल्ह्यात ७३.१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात १७ मिमी, भंडारा १६.२ मिमी, धारगाव १८ मिमी, बेला १४.३ मिमी, पहेला ३५.७ मिमी, खमारी २० मिमी, मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात १९.१ मिमी, वरठी ७.४ मिमी, करडी १६.१ मिमी, कन्हाळगाव २०.२ मिमी, आंधळगाव ६.३ मिमी, तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ८.३ मिमी, तुमसर ८.३ मिमी, सिहोरा १४.२ मिमी, मिटेवानी ५.२ मिमी गर्रा १५ मिमी, पवनी तालुक्यातील अड्याळ मंडळात १५.२ मिमी, कोंढा २.२ मिमी, पवनी ३.४ मिमी, चिचाळ १३.३ मिमी, आसगाव ४.२ मिमी, आमगाव २.१ मिमी, साकोली तालुक्यातील साकोली मंडळात ३५.२ मिमी, एकोडी २४.२ मिमी, सानगडी ३१ मिमी, लाखांदूर तालुकयातील लाखांदूर मंडळात ८.२ मिमी., बारव्हा ७.२ मिमी, मासळ ७.४ मिमी, विरली ५.२ मिमी तर लाखनी तालुक्यातील पोहरा मंडळात १७.८ मिमी, लाखनी ३७.६ मिमी, पालांदूर २१.२ मिमी, पिपंळगाव ३५.१ मिमी पावसाची नोंद झाली.या पावसाने गहू, हरभरा, वटाणा यासह रबी पिकांचे नुकसान झाले. तसेच आधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानही ओला झाला. महिनाभरात शेतकऱ्यांना सहादा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसत आहे.साकोली व पालांदूरमध्ये गारांचा वर्षावपालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांचा वर्षाव झाला. या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्रीसुध्दा अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. दमट हवामानामुळे पीकांवर कीड येण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाययोजना करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी केले आहे. साकोली तालुक्यात बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने फटका दिला. त्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास काही गावांमध्ये बोराच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. सततच्या अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले आहेत. गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. फुलांवर आलेल्या तुरीची फुले गळून पडत आहेत. तालुक्यात उघड्यावर असलेला धानही ओला झाला आहे. गत महिनाभरात सहा वेळा अवकाळी पावसाचा फटका बसला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Rainपाऊस