शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य संपलेल्या कालव्यातून केले जाते पाण्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 21:50 IST

तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३० वर्षांपासून या कालव्यांची योग्य प्रकारे देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देबावनथडी-चांदपूर प्रकल्प । कालवे, उपकालव्यांना पडले भगदाड

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील बावनथडी आणि चांदपूर प्रकल्पाचा आयुष्य संपलेल्या कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे वितरण केले जात आहे. यामुळे ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. परंतु निधीचे कारण पुढे करून कालव्याची डागडूजी केली जात नाही.तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३० वर्षांपासून या कालव्यांची योग्य प्रकारे देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आज या कालव्यांमध्ये ठिकठिकाणी झुडपी वनस्पती वाढली असून अनेक ठिकाणी कालव्यातून पाणी वाहून शेतात शिरण्याचे प्रकार घडत आहेत.दुसरा महत्वाचा प्रकल्प म्हणजे चांदपूर होय. ब्रिटीशकालीन प्रकल्प सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. परंतु या प्रकल्पाच्या कालव्यांची प्रचंड दूरावस्था झाली आहे. दोन दिवसांपुर्वी मुख्य कालव्याला भगदाड पडून हजारो लीटर पाणी व्यर्थ गेले होते. दरवर्षी दोनही प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. परंतु त्यानंतरही कालव्यांची अवस्था दयनिय आहे.बावनथडी व चांदपूर प्रकल्पासाठी अधिकारी व कर्मचारी वर्ग स्वतंत्र आहे. तेही परिश्रम घेत आहे. परंतु आयुष्य संपलेल्या प्रकल्पाचे कालवे आणि वितरिका सुस्थितीत ठेवण्यासाठी निधीची तरतूद केली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी वाहून जात आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पChandpur Lakeचांदपूर जलाशय