लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या रुंदीकरणात अडसर ठरणारे अतिक्रमण काढले जात आहे. मात्र अतिक्रमण काढताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे सीमांकीत केलेल्या ठिकाणापर्यंत अतिक्रमण काढणे अपेक्षित असतांना एका बाजुचे अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांना सवलत दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.जिल्हा परिषद चौक ते खात रोड रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरण गत काही दिवसांपासून सुरु आहे. जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या दरम्यान रस्त्यावर पक्के अतिक्रमण करण्यात आले होते. गत महिन्याभरापूर्वी रस्त्याच्या उजव्या बाजुकडील अतिक्रमण जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आले. त्यात सिमांकन केलेल्या ठिकाणापर्यंतच्या अतिक्रमणाचा समावेश होता. अनेकांच्या इमारतीचा समोरील भाग यात उध्वस्त झाला. आता रस्त्याच्या डाव्या बाजुचे अतिक्रमण काढणे सुरु आहे. परंतु या कामात पक्षपात होत असल्याचा आरोप आहे. सीमांकन केलेल्या ठिकाणाच्या अलिकडूनच अतिक्रमण काढले जात आहे. यात कंत्राटदाराचा पक्षपातीपणा दिसत असल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या एका बाजुच्या नागरिकांवर अन्याय आणि दुसऱ्या बाजुच्या नागरिकांना पाठबळ असा हा प्रकार या दिसून येतो. रस्ता रुंदीकरण करतांना डावी व उजवी बाजू समाज असणे गरजेचे आहे. परंतु येथे तसे दिसत नाही. याप्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा दिला आहे.सौंदर्यीकरण कराभंडारा शहरातील राजीव गांधी चौक हा सर्वात महत्त्वाचा आहे. या चौकातून सात रस्ते शहरातील विविध भागात जातात. त्यामुळे या चौकाचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यात यावे, यासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. यासोबतच बहिरंगेश्वर मंदिरासमोरही सौंदर्यीकरण करण्याची मागणी होत आहे.
भंडारा शहरात अतिक्रमण हटविताना दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:38 IST
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या रुंदीकरणात अडसर ठरणारे अतिक्रमण काढले जात आहे. मात्र अतिक्रमण काढताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आहे.
भंडारा शहरात अतिक्रमण हटविताना दुजाभाव
ठळक मुद्देनागरिकांचा आरोप : जिल्हा परिषद ते राजीव गांधी चौक रस्ता रुंदीकरण