चार रुग्णांना सुटी, 17 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST2021-06-21T05:00:00+5:302021-06-21T05:00:19+5:30

रविवारी ७०३ व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्यात आले.  आतापर्यंत ४ लाख १० हजार ५७२ व्यक्तींच्या घशातील स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात ५९,३७१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यामध्ये भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १, लाखनी ३, साकोली २ व लाखांदूर तालुक्यातील ७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १३९ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १०५५ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.७८ एवढा आहे.

Discharge to four patients, 17 positive | चार रुग्णांना सुटी, 17 पॉझिटिव्ह

चार रुग्णांना सुटी, 17 पॉझिटिव्ह

ठळक मुद्दे७०३ जणांची चाचणी : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात रविवारी चार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८,१७७ झाली आहे. 
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९,३७१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के आहे.
रविवारी ७०३ व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्यात आले.  आतापर्यंत ४ लाख १० हजार ५७२ व्यक्तींच्या घशातील स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात ५९,३७१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यामध्ये भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १, लाखनी ३, साकोली २ व लाखांदूर तालुक्यातील ७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १३९ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १०५५ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.७८ एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयांत बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राइब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

लसीकरणासाठी २४ नवीन बुथची व्यवस्था
- जिल्ह्यात ३० ते ४४ वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले असून नागरिकांचे २१ जूनपासून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरणात ३० ते ४४ या वयोगटांचा समावेश केल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्ह्यात सामान्य रुग्णालय भंडारा, नागरी आरोग्य केंद्र भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय पवनी या पाच लसीकरण केंद्रांत ३० ते ४४ या वयोगटांतील नागरिकांचे कोविशिल्ड लसीव्दारे लसीकरण १९ जूनपासून सुरू करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जनतेच्या सुविधेकरिता सोमवारपासून कोविशिल्ड लसीव्दारे ५० टक्के नोंदणी करून व ५० टक्के प्रत्यक्षपणे लस देण्यात येणार आहे. यात ग्रामीण रुग्णालय मोहाडी, सिहोरा, लाखनी, पालांदूर, लाखांदूर या गावांचा समावेश आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धारगाव, पहेला, शहापूर, मोहदुरा, उपकेंद्र परसोडी (शहापूर) आणि आयुध निर्माणी हाॅस्पिटल जवाहरनगर, मोहाडी तालुक्यातील वरठी, करडी, आंधळगाव, तुमसरातील देव्हाडी, साकोली तालुक्यातील सानगडी व लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, पवनी तालुक्यातील कोंढा व लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा येथे बुथची निर्मिती करण्यात आली आहे.
 

Web Title: Discharge to four patients, 17 positive