शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

माडगी रेती घाटावर धुमाकुळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

माडगी गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदी काठावरच गाव आहे. या येथील घटातून गत काही महिन्यापासून रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीला ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपसा केला जातो. ती रेती गावाजवळच डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर  त्या रेतीची उचल केली जाते. या उपशामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. रात्रभर येथे ट्रॅक्टरची वाहतूक सुरू राहते. त्यामुळे गावकऱ्यांचे झोपमोड होते.

ठळक मुद्देग्रामपंचायत व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष, रेती तस्करीत स्थानिकांचा समावेश

  लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर :  तुमसर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या माडगी येथील वैनगंगा नदीपात्रातून रात्रभर रेतीचा उपसा सुरू असतो. त्यामुळे माडगी गावाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यात अर्थकारण दडल्याची माहिती आहे.  याप्रकरणी स्थानिककार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.माडगी गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदी काठावरच गाव आहे. या येथील घटातून गत काही महिन्यापासून रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीला ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपसा केला जातो. ती रेती गावाजवळच डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर  त्या रेतीची उचल केली जाते. या उपशामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. रात्रभर येथे ट्रॅक्टरची वाहतूक सुरू राहते. त्यामुळे गावकऱ्यांचे झोपमोड होते.या  रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तरीही राजरोसपणे रेतीच्या उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाचे तलाठी कार्यालय आहे. परंतु त्यांनाही हा प्रकार दिसत नाही का हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. रेती तस्करीत स्थानिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. माडगी येथील रेती घाटावर रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. यातील काही असामाजिक तत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्थानिक त्यांचा विरोध करत नाही.   

रेती तस्करांविरूद्ध महिलांचा एल्गारमाडगी येथील नदी घाटातून अवैध रेती उपसा प्रकरणात स्थानिक दारूबंदी कार्यकर्त्या महिलांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी येथील रेती चोरीच्या संदर्भात महसूल प्रशासनाकडे व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. जिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी, आमदार, पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर काही दिवस रेती चोरी बंद होते. त्यानंतर राजरोसपणे पुन्हा रेतीची चोरी सुरू होते त्यामुळे रेती तस्कर यांचे मनोबल येथे वाढले आहे.

उपोषणाचा इशारामाडगी गाव नदी तीरावर असून तेथेच घरे आहेत. पुराचे पाणी गावात शिरते. रेतीच्या प्रचंड उपशामुळे थेट पाणी गावात येण्याची शक्यता आहे. गावाजवळच नदीत रेती उपशामुळे खूप मोठा खड्डा पडला आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हे धोकादायक आहे. नदी घाट लिलाव नसताना रेतीच्या उपशामुळे घाट विद्रुप बनला आहे. रेती तस्कर यांचा कायमस्वरूपी बंदोबस्थ करावा अन्यथा उपोषणाचा इशारा कौतुका मेश्राम, जीवंनकला नागदेवे, ललिता चौरे, करुणा गजभिये, कुसुम वानखेडे, शोभा कांबळे, ममता वानखेडे, कांता बुधे, सविता पंचबुद्धे यांनी  इशारा दिला आहे.

टॅग्स :sandवाळू