शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

आदिवासींमधून धनगरांना आरक्षण सहन करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:40 IST

आदिवासींच्या जनआक्रोश मोर्चाची जिल्हा कचेरीवर धडक : राज्यपालांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने सोमवारला दुपारच्या सुमारास भंडारा शहरातील मिस्कीन टैंक गार्डन येथून मोर्चा काढण्यात आला.

काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या सूचीत घुसविण्याचा असंवैधानिक प्रयत्न करीत आहेत. भाजपा, शिंदे सरकार त्यांना खतपाणी घालीत आहेत. धनगर व धनगड है दोन्ही शब्द अनुसूचित जमातीच्या सूचीत नाहीत, त्यामुळे धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्यात येऊ नये. परंतु, तसे कटकारस्थान विद्यमान सरकारकडून होत असल्याने भाजपा शिंदे सरकारच्या लोकप्रतिनिधींना गावबंदी घाला, निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातून आदिवासी पुढान्यांनी केले. 

जिल्हाधिकारी चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी केले. मोर्चाचे समापन झाल्यानंतर विश्रामगृहात शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन सोपविले. 

सभेच्या मंचावर विनोद वट्टी, बिसन सयाम, जगदीश मडावी, डॉ. वामन शेडमाके, दुर्गाप्रसाद परतेकी, जगन उईके, बी. डी. खांडवाये, हरीभाऊ येळणे, केशव भलावी, कुंदा कुंभरे, पं. स. सदस्य अर्चना इळपाते, सोपचंद सिरसाम, लक्ष्मीकांत सलामे, कांचन वरठे, अनिल कोडापे, एच. एस. मडावी, भोला उईके, अर्चना न्यायमूर्ती, स्मिता सिडाम, प्रमेश मरस्कोल्हे, पंकज पंथधरे, परमेश वलके आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी जयसेवाच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आदिवासी बांधवांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करावा, या संकल्पाचा पुनरुच्चार करण्यात आला. मोर्चाचे संचालन प्रमेश मरस्कोल्हे यांनी केले तर आभार केशव भलावी यांनी मानले. 

महिलांची उपस्थिती लक्षणीय सोमवारला जिल्हाधिकारी कार्या- लयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. यात पुरुषांच्या संख्येपेक्षा महिलांची संख्या अधिक होती. तरुष्ण व बालगोपालसुद्धा आई- वडिलांसोबत उपस्थित असल्याचे दिसून आले. हातात फलक घेऊन आणि खांद्यावर पिवळे दुपट्टे घालून आदिवासी बांधवही सहभागी होते.

प्रमुख मागण्या धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये, आदिवासींसाठी विशेष पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील १७ संवर्ग पदभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात वाची, आदिवासी वसतिगृहातील भोजन डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे मेस व्यवस्था सुरू करावी, विदर्भातील गोंड राजे यांचे गडकिल्ले संरक्षित करून सौंदर्यो- करण करावे, या मागण्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा