भंडारा : लोकमत सखी मंच शाखा भंडारातर्फे १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडा कॉलनीतील प्रांगणात जिल्हास्तरीय धमाल दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील दांडिया संघ सहभाग घेऊ शकतील. विजयी संघांना बक्षिस देवून गौरविण्यात येईल.प्रथम येणाऱ्या संघाला विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी होण्याकरीता प्रत्येक चमूमध्ये १५ वर्षावरील १२ ते १६ व्यक्तीच्या गटात समावेश असावा. हा गट पुरूष, महिला अथवा मिश्र कुठलाही चालेल. प्रत्येक गटाला १५ मिनिट वेळ देण्यात येईल. १२ मिनिटे सादरीकरण व ३ मिनिटे तयारीकरिता राहतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सहभागाकरिता २५० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. मागील वर्षी विजयी संघातील ५ सदस्यावर एका चमुत सदस्य नसावे आढळल्यास संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. दि.१९ आॅक्टोंबरला स्पर्धेस्थळी चमूने सायंकाळी ६ वाजता उपस्थित असणे आवश्यक आहे. वेळेवर उपस्थित नसल्यास स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. परिक्षकांतर्फे नियोजित तक्त्याप्रमाणे गुणदान करण्यात येईल व परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार ८०८७१६२३५२ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)
भंडाऱ्यात सखी मंचतर्फे धमाल दांडिया स्पर्धा
By admin | Updated: October 18, 2015 00:18 IST