शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मातृभाषेच्या संस्कारातून व्यक्तिमत्त्वाचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:44 IST

काळ हा कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक क्षणाचा आपण पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे. मातृभाषेवर प्रभूत्व मिळविल्याशिवाय आपण इतर भाषा शिकू शकत नाही. मातृभाषेच्या संस्कारातूनच आपण व्यक्तीमत्वाचा विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन चोविसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कवी नरेश देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देनरेश देशमुख : साकोली येथे मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन, मनोहर व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : काळ हा कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक क्षणाचा आपण पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे. मातृभाषेवर प्रभूत्व मिळविल्याशिवाय आपण इतर भाषा शिकू शकत नाही. मातृभाषेच्या संस्कारातूनच आपण व्यक्तीमत्वाचा विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन चोविसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कवी नरेश देशमुख यांनी केले.मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली येथील मराठी विभाग ते सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आयोजिलेल्या मराठी वाड:मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित मनोहर वाडम्य मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित मनोहर व्याख्यानमालेतील पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.प्राचार्य डॉ. एच. आर. त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ प्राध्यापक डॉ. ए.एल. चुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यीक राम महाजन, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शंकर बागडे, डॉ. राजेश दिपटे, प्रा. एन.जी. घरत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी राम महाराज यांचे हस्ते मराठी वाड:मय मंडळाचे उद्घाटन झाले. महाराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवन जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे. जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मातृभाषेतून निर्माण झालेले साहित्य प्रत्येकाने वाचले पाहिजे. वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.कवी नरेश देशमुख यांनी मनोहर व्याख्यानमालेतील प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचिन मराठी कविता या विषयाचे सुंदर पुष्प सुंदररीतीने गुंफले. ते म्हणाले मराठी भाषा ही ऐतिहासिक, अमर आणि अभिजात आहे. तिचा इतिहास हा श्रीमंत असा इतिहास आहे. तिच्या कुशीतून अनेक पोटभाषा सुखसमाधानाने अभिव्यक्त होतात. अनेक थोर लेखकांच्या साहित्याचा सुंदर खजिना आपल्या हातात घेऊन मराठी भाषा आपल्यासमोर उभी आहे. हा खजिना ज्यांनी लुटला तोच खरा श्रीमंत.याप्रसंगी महाविद्यालयातील मराठी व सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. गीत गायन, निबंध लेखन, पोस्टर, उत्कृष्ट अध्यापन, वादविवाद, वक्तृत्व, स्वरचित काव्य, लघुकथा लेखन, मराठी म्हणी वाचन या विविध स्पर्धांतील विजेते सुजाता राऊत, प्रशांत पटले, कल्याणी नन्नावारे, काजल प्रत्येकी, प्रिती रोकडे, राजेंद्र चुटे, प्रांजली मेश्राम, अश्विनी खंडाईत, कार्तिक वडस्कर, विवेक क्षीरसागर, अंबादास गेडाम, प्रियंका शेंडे, शिवानी मेश्राम, मोहित मडावी, संदीप मांदाडे, अंजित सिडाम, मिसला सुर्यवंशी, चैतन्य कापगते, श्रद्धा बन्सोड, समता मांढरे, साक्षी राऊत, दिप्ती लेंजे, पवन मांढरे, स्वाती शिवनकर, शिल्पा फाये, प्रविण वाढई, उर्मिला झंझाड, आकाश टेंभूर्णे, विश्वजीत पडोळे, प्रमोद मोहुर्ले, दुर्वास लंजे, मोहिनी भावे, मेघा सोनटक्के व आरती करंजेकार यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विलास हलमारे यांनी करून दिला. अहवाल वाचन मिथून गेडाम यांनी केले. संचालन प्रा. एन.जी. घरत यांनी तर आभार डॉ. राजेश दिपटे यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रा. गहाणे, प्रा. रोकडे, प्रा. कानेकर, प्रा. वैद्य, लांजेवार, दिघोरे, भावे, काकडे, दामिनी नागपुरे, डोंगरे आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.