शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

नागपुरातील अट्टल गुन्हेगार भंडाऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

बसस्थानक परिसरात वावरत असताना संतोष राजपूत याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या बॅगमध्ये घरफोडी करण्याचे साहित्य तसेच दहा हजार ६८० रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली. रकमेबाबत विचारणा केली असता भंडारा शहरात २९ जून ते १ जुलैच्या दरम्यान मोठा बाजार परिसरात केलेल्या घरफोडीच्या घटनेतील पैसे असल्याचे त्याने कबूल केले.  साकोली येथे १५ ते २० दिवसांपूर्वी दुकान फोडण्याची कबुलीही त्याने दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर येथील सराईत गुन्हेगार तसेच घरफोडीच्या विविध घटनांना अंजाम देणाऱ्या एका ३७ वर्षीय गुन्हेगाराला जेरबंद करण्यात भंडारा पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. संतोष सुरेश राजपूत, रा. प्रताप नगर, नागपूर असे जेरबंद केलेल्या अशा अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. ही कारवाई भंडारा पोलीस तथा गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईने भंडारासह नागपूर जिल्ह्यातील विविध घटनांचा उलगडा होण्यास मदत मिळणार आहे. माहितीनुसार, गत तीन दिवसांपूर्वी भंडारा येथील मोठा बाजार परिसरात व्यावसायिक दुकानांचे शटर तोडून चोरी होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या संदर्भातल्या तक्रारी भंडारा पोलीस ठाण्यातही देण्यात आल्या होत्या. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे बाजार परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेला अंजाम देणारा गुन्हेगार हा सराईत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भंडारा पोलिसांनी त्या दिशेने कारवाईसाठी तात्काळ पाऊल टाकले. पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात भंडाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अतिशय गोपनीय पद्धतीने खबऱ्यांच्या संपर्कात राहून या अट्टल गुन्हेगाराचा शोध लावला. बसस्थानक परिसरात वावरत असताना संतोष राजपूत याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या बॅगमध्ये घरफोडी करण्याचे साहित्य तसेच दहा हजार ६८० रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली. रकमेबाबत विचारणा केली असता भंडारा शहरात २९ जून ते १ जुलैच्या दरम्यान मोठा बाजार परिसरात केलेल्या घरफोडीच्या घटनेतील पैसे असल्याचे त्याने कबूल केले. साकोली येथे १५ ते २० दिवसांपूर्वी दुकान फोडण्याची कबुलीही त्याने दिली. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, एचडीपीओ संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे,  फौजदार पुरुषोत्तम शेंडे, पोलीस हवालदार बाळाराम वरखडे, मोजीलाल शहारे, प्रशांत भोंगाळे, साजन वाघमारे, पोलीस शिपाई नरेंद्र झलके, हिरा लांडगे यांनी कामगिरी केली.

चाेरी, घरफाेडीसह २० पेक्षा जास्त गुन्हे - पकडण्यात आलेल्या संतोष राजपूत याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये  २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. चोरी घरफोडीसह अन्य सदराखाली ही गुन्हे आहेत. भंडारा, साकोली व नागपूर येथे घडलेल्या घटनांमागे संतोषचा काय सहभाग आहे, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस