शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बंदीनंतरही मोहफुलाची आंतरराज्यीय वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

मोहफुलापासून मोठ्या प्रमाणात मद्याची निर्मिती केली जात असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष. पशुखाद्याकरिता मोहफुलाची आयात करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली जाते. वर्षातून आठ महिने मोहफुलाची वाहतूक सुरू राहते.

ठळक मुद्दे१ ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत बंदी । मोहफुलाचा मद्य निर्मितीसाठी वापर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मध्यप्रदेश तथा छत्तीसगढ राज्यातून भंडारा जिल्ह्यात बंदी दरम्यान सर्रास मोहफुलाची आयात सुरू आहे. शासन नियमानुसार १ ऑक्टोंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान मोहफुल आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही परराज्यातून मोहफुलाची जिल्ह्यात आयात होत असल्याने यात मोठे अर्थकारण दडल्याची परिसरात र्चा आहे.मोहफुलापासून मोठ्या प्रमाणात मद्याची निर्मिती केली जात असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष.पशुखाद्याकरिता मोहफुलाची आयात करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली जाते. वर्षातून आठ महिने मोहफुलाची वाहतूक सुरू राहते. १६ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर दरम्यान परप्रांतातील मोहफुल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तर १ ऑक्टोबर ते १५ फेब्रुवारी पर्यंत मोहफुल वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. छत्तीसगढ व मध्यप्रदेश मोहफूल उत्पादन करणारी राज्ये आहेत. जिल्ह्याची सीमा दोन्ही राज्यांना लागून असल्याने मध्यप्रदेशातील बालाघाट, वाराशिवनी, तर छत्तीसगडमधील रायपूर येथून मोहफुलाची वाहतूक जिल्ह्यात केली जाते.पशुखाद्याच्या नावाखाली मद्यनिर्मीतीसाठी आयातकेवळ पशुखाद्याकरीता मोहफुलाचा उपयोग करण्याचा नियम आहे, परंतु भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलापासून मद्याची निर्मिती करण्यात येते. मद्य गाळप केंद्र येथे सर्रास सुरू असून पोलिसांचेच त्यांना अभय असल्याने यात अर्थकारण होत असल्याचा आरोप होत आहे. मोहफुल वाहतूकीवर बंदी असताना परराज्यातून वाहतूक कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.