शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विक्रीपत्रांची नोंदणी मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 02:00 IST

राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध करून देणाऱ्या नोंदणी कार्यालयालाही नोटाबंदीचा फटका बसला आहे.

नोटाबंदीचा फटका : महसुलातही घट इंद्रपाल कटकवार  भंडारा राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध करून देणाऱ्या नोंदणी कार्यालयालाही नोटाबंदीचा फटका बसला आहे. महिन्याकाठी ४५० पेक्षा जास्त विक्रीपत्रांची नोंदणी होत असताना नोटाबंदीनंतर हा आकडा १८० वर येवून ठेपला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक व विशेष विवाह अधिकारी कार्यालयात रजिस्ट्रीची कामे केली जातात. यात जमिनीची विक्री, बक्षिस पत्र, गहाण पत्र, भाडेपत्र या प्रकारच्या ६३ विक्रीपत्रांची नोंदणी होत असते. या नोंदणीच्या माध्यमातून कोट्यवधीचा महसूलही शासकीय तिजोरीत जमा होत असतो. ८ नोव्हेंबर नंतर नोटाबंदीमुळे या कार्यालयालाही याचा फटका बसला आहे. एकाच वेळी मोठी रक्कम उपलब्ध होत नसल्याने जमीन विक्री व खरेदीची प्रक्रिया एकंदरीतपणे मंदावल्याचे दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत दर दिवशी १० ते १५ तर महिन्याकाठी सरासरी ४५० पेक्षा जास्त विक्रीपत्रांची नोंदणी होत असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. मात्र नोटाबंदीनंतर सद्यस्थितीत दिवसाकाठी ५ ते ६ विक्रीपत्रांची नोंदणी होत आहे. जमीन खरेदी अथवा विक्रीदरम्यान मोठ्या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात हात उसणवारी अथवा गहाण ठेऊनही पैशाची गरज भागवावी लागत आहे. अशा स्थितीत जमिनीच्या सौद्यात एकमुश्त रक्कम मोजावी लागत असल्याने व बँकेमार्फत फक्त २४ हजारांचीच रक्कम उपलब्ध होत असल्याने नोंदणीवरही याचा फटका बसला आहे. कॅशलेस व्यवहाराला बळ दिले जात असले तरी ग्रामीणसह शहरभागात नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृतीचा अभाव असल्याने त्याचा फटका बसत आहे.