शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
2
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
3
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
4
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
5
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
6
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
7
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
8
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
9
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
10
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
11
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
12
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
13
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
14
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
15
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
16
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
17
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
18
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
19
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
20
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा

लाखनी तालुक्यातील ६७९ परप्रांतीय मजुरांची रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

नागपूरवरुन श्रमिकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जीवनावश्यक साहित्य देवून नागपूर रेल्वेस्टेशन येथे एसटी बसने मोफत सोडण्यात आले. तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही परप्रांतीय मजूर तात्काळ निघुन गेले होते.

ठळक मुद्देलाखनी तहसीलचा पुढाकार : श्रमिक स्पेशल रेल्वेने मजुरांची रवानगी

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे तालुक्यात अनेक परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. तिसऱ्या टप्प्यावरील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना लाखनी तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे थेट मजुरांच्या गावी पोहोचवले जाणार आहे. लाखनी ते नागपूर एसटी बसने मजूरांना पोहोचविले जाणार आहे.नागपूरवरुन श्रमिकांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची आरोग्य तपासणी करुन त्यांना जीवनावश्यक साहित्य देवून नागपूर रेल्वेस्टेशन येथे एसटी बसने मोफत सोडण्यात आले. तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही परप्रांतीय मजूर तात्काळ निघुन गेले होते. मात्र त्यातील अनेक मजूर अडकून पडले होते. तालुक्यात लॉकडाऊन कालखंडात अडकलेल्या मजुरांची संख्या ६७९ आहे. यामध्ये बिहारचे १५५ मजूर, तर उत्तरप्रदेशचे ११२, मध्यप्रदेश ५९, छत्तीसगढ १२, झारखंड ६२, हरियाणा १७, पश्चिम बंगाल २६ व इतर राज्यातील २२६ मजूर लाखनी तालुक्यात अडकले होते. यामध्ये मजुरीसह छोटामोठा व्यवसाय करणारे देखील परप्रांतीय आहेत. तालुक्यात उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु होते.राज्य महामार्गाचे रुंदीकरण, खोसेखुर्द कालव्याचे काम सुरु होते. सदर कामावर परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात होते. यासाठी तालुक्यात अडकलेल्या मजुरांना थेट त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याची मोहीम लाखनीचे तहसीलदार मलीक विराणी यांच्या नेतृत्वात सुरु आहे. तालुक्यात मोठ्या संख्येचे परप्रांतीय मजूर कामावर होते.लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या मजुरांची जिल्हा परिषद गांधी विद्यालयात तालुका प्रशासनाने व्यवस्था केली आहे. या मजुरांना दररोज जेवन, चहा, नास्ता दिला जात होता. सोमवारी दुपारी ३ वाजता एसटी बसने नागपूर रेल्वेस्टेशनवर मजुरांना सोडण्यात आले.प्रशासनाचे मानले आभारकोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढत असताना लाखनी तालुका प्रशासनाच्यावतीने ६७९ मजुरांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मजुरांना जेवनासह इतर सुविधा पुरविण्यात आल्या. यावेळी आपल्या गावाकडे निघालेल्या मजुरांनी लाखनी तहसीलदार मलिक विराणी यांच्यासह प्रशासनाचे आभार मानले. यावेळी अनेक मजुरांना भावना अनावरण झाल्या होत्या.

टॅग्स :Socialसामाजिक