शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्ली येथे डेंग्यूची लागण

By admin | Updated: August 16, 2014 23:18 IST

मागील १५ दिवसांपासून सिल्ली येथे डेंग्यू आजाराची लागण सुरू झाली आहे. चार बालकांना या आजाराने ग्रासले आहे. १५ च्यावर संशयित रुग्ण असून याबाबत आरोग्य विभागाला माहिती देऊनही

चार मुले बाधित : डास प्रतिबंधक फवारणी नाहीभंडारा : मागील १५ दिवसांपासून सिल्ली येथे डेंग्यू आजाराची लागण सुरू झाली आहे. चार बालकांना या आजाराने ग्रासले आहे. १५ च्यावर संशयित रुग्ण असून याबाबत आरोग्य विभागाला माहिती देऊनही गावात डास प्रतिबंधक फवारणी केली नाही. जुलै महिन्यात दोन मुलांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले होते. यात तुषार घनश्याम चोपकर व दिपांशू आनंद साखरवाडे या मुलांना डेंग्यूने ग्रासले होते. या महिन्यात सेजल राजेश हुमणे (५), परीक्षित किशोर वासनिक (८), पारस जितेंद्र हुमणे (१३) व सांची जितेंद्र रामटेके (१०) या मुलांना डेंग्यूची लागण झाली आहे. यात सेजल हुमणे व परिक्षीत वासनिक यांना नागपुरला हलविण्यात आले आहे. पारस व सांची या भावंडावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जुलै महिन्यात सिल्ली गावात डेंग्यूची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. सिल्लीत डासांचा प्रादुर्भाव असून ग्रामपंचायतने उपाययोजना केली नाही. अनेक वर्षापासून डास प्रतिबंधक धुरफवारणी केली नाही. मशीन नादुरुस्त असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणने आहे. (शहर प्रतिनिधी)