शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

वारपिंडकेपार येथे शासकीय बांधकामाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

वारपिंडकेपार येथील एका इसमाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, हातपंप, सिमेंट रस्ता बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली. काही गावकऱ्यांनी बांधकामाची तोडफोड होत असताना पाहिल्याने तोडफोड करणाऱ्या इसमाला समजविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपोलिसांकडून जेसीबी मशीन जप्त : ठाणेदारांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार येथे एका इसमाने शासकीय बांधकामाची तोडफोड करून बांधकामाची जागा स्वत:ची असल्याचा दावा केला.वारपिंडकेपार येथील एका इसमाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, हातपंप, सिमेंट रस्ता बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली. काही गावकऱ्यांनी बांधकामाची तोडफोड होत असताना पाहिल्याने तोडफोड करणाऱ्या इसमाला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो इसम कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने गावकऱ्यांनी एकत्र येत समजवण्याचा प्रयत्न केला. रोहयो कामावरील मजुरांना एकत्र येत बांधकाम थांबविण्याचा प्रयत्न केला. वारपिंडकेपार हे दीड हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथील गावकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक ग्रामपंचायततर्फे बांधकाम करण्यात आली आहेत. मात्र बांधकाम आपल्या जागेवर झाले असल्याचा आरोप करीत गावातीलच एका व्यक्तीने बांधकामाची तोडफोड सुरुच ठेवली. ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबतची कोणतीही पूर्व सूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने थेट बांधकाम तोडफोड करीत असल्याने गावातील सरपंच बबीता पटले व उपसरपंच रमेश तोरणकर यांनी पोलिसांना माहिती दिली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र पोलीस येण्यापूर्वी गावकºयांमध्ये आणि बांधकामाची तोडफोड करणाºया इसमामध्ये शाब्दीक चकमक उडाली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला. शासकीय बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीसांनी जेसीबी मशीन ताब्यात घेतली आहे. वाढता तणाव लक्षात घेता ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांनी वेळीच घटनास्थळी पाहणी करून पुढील चौकशीची गावकºयांना ग्वाही दिली.गत २० वर्षापासून शासकीय जागेवर बांधकाम असताना आजपर्यंत कोणताही दावा न करता किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न दाखवता इसमाने बांधकामाची तोडफोड केल्याची तक्रार ग्रामपंचायतने दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.गेल्या २० वर्षापासून या जागेवर शासकीय बांधकाम असताना कधीही कोणाकडून विरोध करण्यात आला नाही. ग्रामपंचायतला पूर्व सूचना न देता बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे.-जितू पटले, ग्रामपंचायत सदस्य, वारपिंडकेपार.

टॅग्स :Policeपोलिस