शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

मागणी 40 लाख बारदाना नगाची, जिल्ह्याला मिळाले केवळ दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

गाेदामाच्या अभावी धानखरेदीला उशीर झाला. भरडाईसाठी धान मिलर्सने वेळेत उचलला नाही परिणामी गाेदाम फुल्ल हाेते. रबीतील धान काेठे ठेवावा? असा प्रश्न हाेता. शेवटी यावर ताेडगा काढत बंद असलेल्या शाळा धान साठविण्यासाठी घेण्याचा निर्णय झाला. अखेर १८ मेपासून जिल्ह्यात धानखरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १३८ आधारभूत केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १३३ केंद्राचे उद्घाटन झाले. तर प्रत्यक्षात १२९ केंद्रावर धानखरेदी झाली.

ठळक मुद्देरबी धान खरेदी : बारदान्याअभावी धान खरेदी ठप्प

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  सुरुवातीला भरडाईसाठी धानाची उचल न झाल्याने गाेदामाचा प्रश्न आणि आता खरेदी झालेले धान भरण्यासाठी बारदान्याचा अभाव असे शुक्लकाष्ठ यंदा रबी हंगामातील धानखरेदीचा मागे लागले आहे. सुरुवातीपासूनच अडचणीत आलेली धानखरेदी अंतिम टप्यात असताना आता बहुतांश केंद्रावर बारदानच नाही. पणन महासंघाने ४० लाख बारदान नगाची मागणी केली. परंतु जिल्ह्याला केवळ दहा लाख बारदाना नग प्राप्त झाले. त्यामुळे अनेक केंद्रांवरील धानखरेदी आता ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यात दरवर्षी १ मेपासून धानखरेदीला प्रारंभ हाेताे. परंतु गाेदामाच्या अभावी धानखरेदीला उशीर झाला. भरडाईसाठी धान मिलर्सने वेळेत उचलला नाही परिणामी गाेदाम फुल्ल हाेते. रबीतील धान काेठे ठेवावा? असा प्रश्न हाेता. शेवटी यावर ताेडगा काढत बंद असलेल्या शाळा धान साठविण्यासाठी घेण्याचा निर्णय झाला. अखेर १८ मेपासून जिल्ह्यात धानखरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १३८ आधारभूत केंद्रांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १३३ केंद्राचे उद्घाटन झाले. तर प्रत्यक्षात १२९ केंद्रावर धानखरेदी झाली. २८ जूनपर्यंत २० हजार १५४ शेतकऱ्यांनी ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानाची विक्री केली. मात्र आता बारदानांचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर बारदानांचा तुटवडा निर्माण झाला आहे.यावर ताेडगा काढण्यासाठी जिल्हा पणन कार्यालयाने संबंधितांकडे ४० लाख बारदान नगाची मागणी केली. मात्र जिल्ह्याला आतापर्यंत केवळ १० लाख नग बारदान प्राप्त झाले आहे. अद्यापही धानखरेदी सुरू आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार १४ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न अपेक्षित आहे. ऐवढा धान साठविण्यासाठी माेठ्या प्रमाणात बारदान्याची गरज आहे. परंतु जिल्ह्याला केवळ १० लाख बारदान मिळाल्याने धानखरेदी प्रभावित झाली आहे. बारदाना नसल्याने अनेक केंद्र चालकांपुढे खरेदीचा प्रश्न आहे.

२० हजार शेतकऱ्यांनी विकला धान- रबी हंगामात जिल्ह्यातील २० हजार १५४ शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीनुसार धान विकला आहे. पणन महासंघाने ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धान खरेदी केला आहे. भंडारा तालुक्यात ५५ हजार २३६ क्विंटल, माेहाडी तालुक्यात १ लाख ५५ हजार ८२० क्विंटल, तुमसर तालुक्यात दोन लाख ४७ हजार ५४९, लाखनी तालुक्यात ६६ हजार ८६ क्विंटल, साकाेली तालुक्यात एक लाख १९ हजार ७७८ क्विंटल, लाखांदूर तालुक्यात एक लाख ३६ हजार ९३४ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ७६ हजार ३९ असा आठ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानखरेदी करण्यात आला आहे.

धानखरेदीचा आज शेवटचा दिवसआधारभूत धानखरेदी करण्याचा ३० जून हा शेवटचा दिवस आहे. मात्र यंदा उशिराने खरेदी सुरू झाल्याने आधारभूत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. आतापर्यंत निम्माच धान खरेदी झाला आहे. त्यामुळे एक महिना मुदतवाढ देण्याची गरज आहे. मुदत वाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागेल. त्यात त्यांची आर्थिक पिळवणूक हाेणार आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड