शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल.

ठळक मुद्देराजेगाववासीयांची मागणी : प्रकरण अशोक लेलँड कंपनीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गडेगाव स्थित अशोक लेलँड कंपनीने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिखली (हमेशा) या रिठी गावातील गट क्रमांकावरील जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले आहे. या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जमीन मोकळी करुन द्यावी, अन्यथा २ आॅक्टोंबर रोजी आंदोलन छेडण्यात येईल. अशा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीने चिखली हमेश या रिठी गावातील गट क्रमांक १, ४७, ५७ व ५५ या एकुण २६ एकर जागेवर पक्के बांधकाम केले आहे. बळजबरीने व चुकीच्या पध्दतीने हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकाम हटविण्यासाठी महसुल मंत्री व अप्पर सचिव मुंबई तथा नागपूरच्या आयुक्तांना २१ जुलै २०१८रोजी पत्र देण्यात आले होते. यासंदर्भात चार आॅगस्ट २०१८ला भंडाराचे उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी प्रत्यक्ष मौका चौकशी करुन अतिक्रमण बाबतची माहिती व पुरावे ग्रामस्थांकडून घेतले आहे. यासंदर्भात ३० आॅगस्टला भंडारा येथे सभा बोलाविली होती. यात अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक अनुपस्थित असल्याने सभा बरखास्त करण्यात आली. ७ सप्टेंबरलाही झालेल्या बैठकीत कंपनीचे व्यवस्थापक आले नाहीत. एसडीओ महिरे यांनी सभा घेतली. यात अतिक्रमण पाडण्यासाठी आपण ‘‘आग्रह धरु नका, कुणाकडे तक्रार करु नका, कुणालाही याबाबत सांगु नका मी आणि जिल्हाधिकारी व अशोक लेलँड कंपनीचे व्यवस्थापक यांना भेटून गावातील लोकांना नोकरी लावुन देतो’’, अशी हमी दिली. २०० लोक बेरोजगार आहेत.१८ सप्टेंबर व त्यानंतर २५ सप्टेंबरला तहसील कार्यालयात सभेसाठी ग्रामस्थांनी पुराव्यासह हजेरी लावली होती. मात्र या सभेतही अधिकाऱ्यांनी कंपनीचीच बाजू घेतली. अशा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीचे व्यवस्थापक कुठलीही बाजू मांडत नव्हते. याउलट ‘‘परत सातबारा द्या’’ अशी उत्तरे देत होते. १६ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार चिखली हमेशा येथील ही जमीन औद्योगिक प्रकल्प म्हणून चुकीची नोंद घेतली आहे.याबाबत पुरावा देवूनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी राजेगाव वासीयांचे म्हणने लक्षात घेतले नाही. असेही निवेदनात नमूद आहे.चिखली हमेशा हे गाव राजेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे किंवा नाही याचा पुरावा सादर करा, असे म्हटले चिखली हमेशा हे गाव ६ आॅगस्ट १९५५ ला राजेगावमध्ये विलिन झाले आहे. याची नोंद भुमिअभिलेख कार्यालयात आहे.ही जागा गावकऱ्यांची आहे. राजेगाववासीयांची ही फसवणुक असून कंपनीचे व्यवस्थापक अरविंद बोराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ग्रामस्थांना न्याय देत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनाही निलंबित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनात नरेश शेंडे, वसंता वासनिक, कुंजन शेंडे, देवराम वासनीक, प्रकाश झंझाड, सचिन शेंडे, अनिता शेंडे, अंताराम गंथाडे, विशाल रामटेके, अशोक शेंडे, परसराम बोंद्रे, मुकेश गणविर, तुकाराम झलके आदींच्या स्वाक्षºया आहेत.