शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

देव्हाडा गावाला हागणदारी मुक्तीचा ध्यास

By admin | Updated: January 14, 2015 23:02 IST

देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती

युवराज गोमासे - करडी (पालोरा)देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती झगडू बुद्धे यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची सभा बोलाविली. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करवून त्यास मंजुरी दिली गेली. गावात २८३ कुटुंबांनी शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात केली. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा गावाची शौचालयाच्या बाबतीत अवस्था अवघड होती. उन्हाळ्यात उघड्यावर शौचास जायचे. पावसाळ्यात तारांबळ उडायची. महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागायचा. रात्री अंधारात जावे लागत होते. या दयनीय परिस्थितीचा सामना महिलांना करावा लागायचा. बिडीओंनी सरपंचाची कैफीयत ऐकून विस्तार अधिकाऱ्याला गावाला भेट देण्याचे निर्देश दिले. ३० डिसेंबर २०१४ रोजी खंडविकास अधिकारी डी.व्ही. आगलावे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला पंचायत विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत बोहटे, सरपंच पुष्पलता ढेंगे, उपसरपंच वंदना सोयाम, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, झगडू बुद्धे, ग्रामसेवक आर.बी. बोरकर, ग्रामपंचायत सदस्य रामानंद कांबळे, सुरेश कांबळे, छगनलाल उईके, दर्शनकुमार डोंगरे, पार्वता कांबळे, अनुरथा बुद्धे, आशा शहारे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना चौधरी, लता आरामे, गट संसाधन केंद्राचे समूह समन्वयक, निर्मूल दूत, अंगणवाडी व आरोग्य सेविका, शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने हजर होते. ३१ डिसेंबर २०१४ ते ७ जानेवारी २०१५ पर्यंत गावाचे सर्व्हेक्षण करून ८ जानेवारी रोजी पाणी व स्वच्छता बाबत जनजागृती रॅली काढून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. हागणदारी निर्मूलन आराखड्याला सर्वानुमते मंजुरी दिली गेली. गट संसाधन केंद्राचे समूह समन्यवक जी.एस. अंबुले, पी.व्ही. गणवीर यांचे मार्फत संपूर्ण गावाची परिसराची पाहणी करण्यात आली. मानवी मलमूत्र व्यवस्थापनाबद्दल नागरिकांनी माहिती जाणून घेतली. संस्था स्तरावरील इमारती, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन माहिती संकलीत केली. सामूहिक प्रयत्नांचा परिचय या गावाने दिला असून स्वयंप्रेरणेने झटणारे मोहाडी तालुक्यातील ते एकमेव गाव ठरले आहे.