दुकानदारांचाच अंगठा लावून धान्य वाटपाचा निर्णय लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:37 AM2021-04-23T04:37:31+5:302021-04-23T04:37:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा करून पॉस मशीनवर दुकानदारांचा अंगठा लावून ...

The decision to distribute foodgrains with the thumbs up of the shopkeepers is early | दुकानदारांचाच अंगठा लावून धान्य वाटपाचा निर्णय लवकर

दुकानदारांचाच अंगठा लावून धान्य वाटपाचा निर्णय लवकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मोहाडी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा करून पॉस मशीनवर दुकानदारांचा अंगठा लावून धान्य वाटपाचा निर्णय तातडीने घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री विश्वजित कदम यांनी भंडारा जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेला दिली.

भंडारा जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विश्वजित कदम यांची भंडारा येथे भेट घेतली.

कोविड - १९चा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. धान्य वाटप करताना एकाच पॉस मशीनवर अनेक शिधापत्रिकाधारकांचे अंगठे घेतले जातात. त्यांचा सरळ संपर्क दुकानदारांसोबत येत असतो. याच संपर्कामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील दहा सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाला आहे तसेच बऱ्याच दुकानदारांना कोविडची बाधा झाली आहे. आणखी कोणत्याही दुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी ही बाब पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या लक्षात आणून देण्यात आली. सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना विमा दिला जाईल तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत २७० रूपये प्रतिक्विंटल कमिशन मर्जिन देण्यात यावे, शिधापत्रिकाधारकांना कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दुकानदाराच्या अंगठा प्रमाणित करून दुकानदारांचा अंगठा लावण्यात यावा व त्या पद्धतीने धान्यवाटप करण्यात यावे, असे तत्काळ निर्णय घेण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच योग्य मागण्या मान्य करण्यात येतील, असे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी आश्वासन दिले. यावेळी निवेदन व चर्चा करताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई, जयश्री बोरकर, प्रशांत देशकर, धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे, मिलिंद रामटेके, गुलराज कुंदवानी, बाळू बोबडे, शोहेल अहमद, ओमप्रकाश थानथराटे, हितेश सेलोकर, विजय सूर्यवंशी, मनोहर लांजे, वाल्मिकी लांजेवार, जयगोपल लांडगे, आदी सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Web Title: The decision to distribute foodgrains with the thumbs up of the shopkeepers is early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.