लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : टायर फुटल्यामुळे करडीहून देव्हाडाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्यामुळे रस्त्यावरील दोन सायकलस्वार व एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे किरकोळ जखमी तर, एकजण गंभीररीत्या जखमी झाले होते. दुचाकीचालक गंभीर जखमी रामचंद्र नारायण तुमसरे (४५) रा.सालई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता.मात्र बुधवारला घटनेच्या १२ दिवसानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.देव्हाडा साखर कारखान्याजवळ दि.११ मे रोजी सायंकाळच्या सुमारास चारचाकी वाहनाचे (एमएल ३१ एफए ५०८३) करडीहून देव्हाडाकडे जात असताना टायर फुटले. त्यानंतर दुचाकी (एमएच ३६/एम ३७५३) ला धडक दिली. दोन सायकलस्वारांना धडक लागली. यात दुचाकीचालक रामचंद्र तुमसरे (४५) रा.सालई हे गंभीररित्या जखमी झाले होते. गंभीर जखमीवर भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बुधवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
अपघातातील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:57 IST
टायर फुटल्यामुळे करडीहून देव्हाडाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्यामुळे रस्त्यावरील दोन सायकलस्वार व एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली.
अपघातातील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
ठळक मुद्देसालईत शोककळा : मृत्यूशी झुंज संपली