लोकमत
न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव ट्रकने इंडिका कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेला गावानजीक मंगळवारी दुपारी घडली.रोहीत मुरलीधर नाकतोडे असे मृताचे नाव आहे. नागपूर येथून इंडिका कार मंगळवारी दुपारी भंडाराकडे येत होती. त्यावेळी बेला गावाजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने इंडिका कारला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात चालक रोहीत नाकतोडे हा गंभीर जखमी झाला तर त्याच्या शेजारी असलेला इसम गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.राष्टÑीय महामार्गावर अहोरात्र भरधाव वाहतूक सुरु असते.बेलाजवळ अपघातात एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:02 IST