लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रूग्णालयातील शुद्ध पेयजल यंत्रात एक मोठा बेडून कुजलेल्या स्थितीत आढळला. चार ते पाच दिवसापासून पाण्याची दुर्गंधी येत होती. एक रूग्णाच्या नातेवाईकाने पाणी पिल्यावर उलटी व मळमळीचा त्रास जाणवला. त्यानंतर हा प्रकार सोमवारला दुपारी उघडकीस आला.राजेश मसरके रा. देव्हाडी यांची आई शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ११.३० वाजता रूग्णालयातील दार्शनीक भागावर शुद्ध पेयजल यंत्रातून राजेशने पाणी पिले. तेव्हा त्यांना पाण्याची दुर्गंधी आली. आधी मळमळ वाटू लागले नंतर त्यांना उलटी झाली याची माहिती राजेशने रूग्णालय प्रशासनाला दिली.रूग्णालय प्रशासनाने दखल घेत शुद्ध पेयजल यंत्र उघडले. त्यात त्यांना मृत बेडूक दिसला बेडूक कुजलेल्या स्थितीत होता. संपूर्ण यंत्र स्वच्छ करण्यात आले. मागील तीन ते चार दिवसापासून या यंत्रातून शेकडो रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांनी पाणी प्राशन केले. नियमित यंत्राची स्वच्छता करण्याची येथे गरज आहे. राजकुमार फुलवधवा यांनी पेयजल यंत्र रूग्णालयाला भेट दिले आहे. निदान भेट दिलेल्या यंत्राची रुग्णालय प्रशासनाने नियमित देखभाल करण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घेणाºया रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे.रुग्णालयातील पेयजल यंत्रात मृत बेडून आढळला. रुग्णांचे नातेवाईक यंत्राच्या वरून पाणी काढतात. त्यांनी तसे करू नये. बेडून कुठून आत शिरले हे तपासण्यास सांगितले. पेयजल यंत्र स्वच्छ करण्यात आले.-डॉ. कल्पना म्हैसकर, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तुमसर.
पेयजल यंत्रात आढळले मृत बेडूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:19 IST
आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रूग्णालयातील शुद्ध पेयजल यंत्रात एक मोठा बेडून कुजलेल्या स्थितीत आढळला. चार ते पाच दिवसापासून पाण्याची दुर्गंधी येत होती. एक रूग्णाच्या नातेवाईकाने पाणी पिल्यावर उलटी व मळमळीचा त्रास जाणवला. त्यानंतर हा प्रकार सोमवारला दुपारी उघडकीस आला.
पेयजल यंत्रात आढळले मृत बेडूक
ठळक मुद्देतुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार : काहींना उलटीचा त्रास तर काहींना मळमळ