शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: July 4, 2015 01:25 IST

एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू आहे.

खातिया : एकही मूल शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेतील चित्र बघितल्यास शासनाची ही उठाठेव फोल वाटते. कारण, जिर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीत येथील विद्यार्थी जीव मुठीत धरून क,ख,ग चे धडे गिरवीत आहेत. जीवावरचा हा खेळ असूनही शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने पालकांत मात्र रोष व्याप्त आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जिर्ण अवस्था आहे. कौलारू इमारतींत येथील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. शिक्षण हक्काच्या नावावर शासन एकही मुल शिक्षणापासून वंचीत राहू नये म्हणत आहे. तर दुसरीकडे मात्र आहे त्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात शासन अपयशी ठरत असल्याचे हे मुर्त उदाहरण आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून शासन विविध योजना राबवित आहेत. मात्र येथील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र मात्र त्यांच्या नजरेत येत नाही. एकीकडे शाळेत बसण्यासाठी जागेचा अभाव आहे. त्यातही शाळेची इमारत कधी अंगावर पडेल याचा नेम नसल्याने विद्यार्थीच काय पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यानंतर धास्तीत राहतात असे चित्र आहे. त्यात पावसाळ््यात तर अधिकच स्थिती गंभीर असते. पावसाचे पाणी वर्गांत गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसणे कठिण होते. शाळेच्या या अवस्थेबद्दल शिक्षण विभागाला कित्येकदा कळविण्यात आले आहे. मात्र शिक्षण विभाग डोळ्यावर हात धरून बसल्याने त्यांना येथील शाळेची दुरवस्था दिसत नाही. परिणामी आहे त्या स्थितीत जीव मुठीत धरून विद्यार्थी व शिक्षक शाळेत येत आहेत. शिक्षण विभागाच्या या पंगू कारभारामुळे पालकांत मात्र रोष व्याप्त आहे. सध्या पावसाळा सुरू असून पावसामुळे इमारत अधिक जिर्ण होऊन कधीही पडण्याची शक्यता टाळता येत नाही. अशात एखाद्याच्या जीवावर बेतण्याची वाट शिक्षण विभाग बघत आहे काय असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेच्या इमारतीची ही अवस्था बघता शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)