शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या साठवणूक पाण्यात वाढ; मदतीसाठी बपेऱ्यातील बळीराजाचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:35 IST

बपेऱ्याचे शेतकरी नव्या संकटात : सर्वेक्षणानंतरही स्थिती 'जैसे थे'

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवरील कवलेवाडा धरणात पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करण्यात आल्याने बपेरा गावातील शेतकऱ्यावर नवे संकट ओढवले आहेत. बागायती शेत बुडाले आहेत. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा २ अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले असले, तरी बुडीत शेतीची आर्थिक मदत मिळाली नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प आणि अदानी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा गावाचे शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प १ आणि २ ला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात पाणी अडविण्यात येत आहे. धरणात पाणी अडविण्यात येणार असल्याने सिंचन प्रकल्पाने शेतकऱ्यांचे नद्यांचे काठालगत शेतशिवार करारबद्ध केले आहे.

मात्र सूचना दिली नाही गावातील १२ शेतकऱ्यांनी मालकीच्या शेतात भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कवलेवाडा धरणात पाण्याचे साठवणूक क्षमतेत वाढ करण्यास सुरुवात करण्यात आली पण सूचना देण्यात आली नाही.

शेतशिवारात पाणी वैनगंगा नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. धरणाचे संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नदीचे पात्र तुडुंब भरल्याने बपेरा गावाच्या शेतशिवारात शिरल्याने भाजीपाला उत्पादनाचे पीक अक्षरशः बुडाले आहे.

१२ भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसानशेतकऱ्यांचे बागायत शेत बुडाले आहेत. गतवर्षीही अशीच अवस्था या शेतकऱ्यांची झाली होती. मात्र मदतीच्या अपेक्षेत असतानाही त्यांना न्याय मिळालेला नाही.

हे आहेत बुडीत शेतीचे शेतकरी फटका बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये हिरालाल उपरीकार, वासुदेव उपरीकार, महादेव उपरीकार, तिलकचंद राऊत, शोभाराम राऊत, गुहू आंबेकर, सुरेश जताळे, पुरुषोत्तम उपरीकार, दिलीप मुळे, अजय खंगार, विक्रम बोरघरे, नंदलाल बोरघरे यांचा समावेश आहे. पिकांची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प २ ची असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

"धरणात पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करण्यात आल्याने बपेरा गावाच्या शेतशिवारात घेण्यात येणारे भाजीपाला उत्पादनाचे पीक बुडाले असून सडले आहेत. शेतशिवार धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प २ सोबत करारबद्ध नाही. यामुळे नुकसाभरपाईची मागणी करण्यात आली आहे."- हिरालाल उपरीकार, शेतकरी, बपेरा.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी