शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पिकांचे नुकसान

By admin | Updated: November 13, 2014 22:57 IST

तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर

साकोली : तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आधीच निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मागील वर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असतांना अधिकाऱ्यांच्या मनमानीचाही सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला 'अच्छे दिन आयेंगे'ची स्वप्न दाखविली. त्याचा राजवटीत हेच का अच्छे दिन? अशी म्हणण्याची वेळ जांभळी सडक येथील शेतकऱ्यांवर आली आहे.साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकरी चंद्रशेखर रामटेके, भाऊराव मेश्राम, भाऊराव रामटेके, अशोक नागदेवे, रवि चोपकर, मंगल तिरपुडे, भागवत पात्रीकर, किशोर नंदुरकर यांच्यासह इतर दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची गरज होती. गुढरी जलाशयाचे पाणी २९ सप्टेंबरपासून शेतीला सोडण्यात आले.या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहचलेच नाही. पाण्याअभावी या शेतकऱ्यांचे पीक करपले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी वाटप करतांना चुकीचे धोरण अवलंबिले. या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या पाणी वाटप प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. जर दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करु, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)