शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

साकोली, पवनी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:29 IST

तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे.

ठळक मुद्देपावसाचे तीन नक्षत्र कोरडे : पऱ्हे करपले, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न, दुष्काळसदृश परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली/पवनी : तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली. पावसाला सुरुवात होऊनही पुरेशा प्रमाणात पाऊस आलेला नाही. ओलिताखालील क्षेत्रात धानाची रोवणी झाली असली तरी रोवणी वाळत आहे. तर कोरडवाहू शेतातील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मात्र पाऊस येईलच व दुबार पेरणी होईलच याचा नेम नाही.गत पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आधीच दुष्काळाचा झळा शोषित असून कर्जबाजारी झाले आहेत. आधीचेच कर्ज फेडुन झाले नाही तर आता यावर्षी पुन्हा कर्ज काढले ते कधी फेडून होतील, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी ओलीताखाली असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. मात्र भारनियमनामुळे केवळ आठ तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी पुरेशा होत नाही. त्यामुळे रोवणीही वाळत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू जमीनीतील पऱ्हे करपले आहेत. एकंदरीत शेतकरी अडचणीत सापडला आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकलायावर्षी वर्तविण्यात आलेले हवामान खात्याचे अंदाज सपशेल खोटे ठरले. रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होत असला तरी मृग, आद्रा व पुनर्वसू हे तिन्ही पाऊस पडणारे नक्षत्र मानुन बळीराजाने खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. आद्रा नक्षत्रात हलका पाऊस झाल्याने भातपिकाचे नियोजन करुन पऱ्हे टाकण्यात आले. आद्रानंतर पुनर्वसू कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. तिन्ही महत्वाचे नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.शेतमालाला भाव नाही, कर्जदारांकडून विमा सक्तिने वसूल करण्यात येते, निसर्ग साथ देत नाही अशा तिहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने अशा परिस्थितीचा सामना कसा करावा हा प्रश्न उभा ठाकला आहे.ऋतू पावसाळा मात्र अनुभवायला मिळतो उन्हाळा. धानाचे नाजूक रोपटे प्रचंड तापमानामुळे करपू लागले आहेत. शेतातील विहिरींना, विंधन विहिरींना पाणी नाही. गोसीखुर्द धरणाचे पाणी अपूर्ण लघूकालव्या अभावी शेतापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीत धानाचे पऱ्हे जगवायचे कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. पऱ्हे जगले नाही आणी पाऊस पडला तर दुबार पेरणीसाठी बियाणे कसे मिळणार असाही प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावत आहे.भारनियमनात दुजाभावसाकोली तालुक्यात कुठे आठ तास, तर कुठे बारा तास. कुठे २४ तासही विजपुरवठा मिळत आहे. त्यामुळे विज वितरण कंपनी शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत असून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. हा भेदभाव बंद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.जलस्रोतांची पातळी खालावलीपावसाळा असुनही पाऊस आला नाही व शेतात सर्वत्र बोरवेलचे पाणी देणे सुरु आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून शेतीला पाणी पुरत नाही.