लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहत असलेले भोजराम सोनकुसरे यांची पत्नी बाजार चौकातील हॉटेलचे काम आटपवून घरी आल्या. सायंकाळी ७.३० वाजता रात्रीचे स्वयंपाक करण्याकरिता गॅस सिलिंडरचा रेगुलेटर सुरू करून लायटर लावताच गॅस सिलिंडरचा भडका उडाला. जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून परिस्थिती धोक्याबाहेर आहे.आगीचा भडका येवढा तीव्र होता की घरातील दारे, खिटक्या, जीवनोपयोगी वस्तू यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन यात दुर्गा भोजराम सोनकुसरे (५४), निलेश भोजराम सोनकुसरे (३०), संतोष सोनकुसरे हे मदतीला गेले असता जखमी झाले.परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य संजय गोखले यांना फोन करून माहिती दिली. संजय गोखले यांनी आगिची तिव्रता बघून पोलीस स्टेशन आंधळगावला कळविले.पोलीस स्टेशन आंधळगावचे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांनी तातडीने पोलीस ताफा पाठवून अग्नीशामक यंत्राद्वारे आग विजविण्यास पोलीस हवालदार बाभरे, वैरागडे, सिंगाडे, वाळके यांनी मदत केली. सदर प्रकरणात मोठी जिवीतहानी टळली.
आंधळगावात सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:00 IST
येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहत असलेले भोजराम सोनकुसरे यांची पत्नी बाजार चौकातील हॉटेलचे काम आटपवून घरी आल्या. सायंकाळी ७.३० वाजता रात्रीचे स्वयंपाक करण्याकरिता गॅस सिलिंडरचा रेगुलेटर सुरू करून लायटर लावताच गॅस सिलिंडरचा भडका उडाला. जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून परिस्थिती धोक्याबाहेर आहे.
आंधळगावात सिलिंडरचा स्फोट
ठळक मुद्देतीन जण जखमी : जिल्हा रुग्णालयात उपचार