कटकवार विद्यालय डॉ. आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:25+5:302021-04-15T04:33:25+5:30

साकोली : स्थानीय कृष्णमुरारी कटकवार विद्यालय कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वी ...

Cuttack School Dr. Ambedkar Jayanti | कटकवार विद्यालय डॉ. आंबेडकर जयंती

कटकवार विद्यालय डॉ. आंबेडकर जयंती

Next

साकोली : स्थानीय कृष्णमुरारी कटकवार विद्यालय कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य देवगिरकर प्रा. विनोद हातझाडे, प्रशांत शिवणकर, राजेश भालेराव, शिवदास लांजेवार, बाळकृष्ण दिनेश उईके, हरिश्चंद्र सोनावने, चने सुकारे, रणदिवे, नीलिमा गेडाम, पुष्पा बोरकर, सुनील मोहनकर, संजय भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता एमएससीआयटीएमकेसीएलच्या वतीने डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले. वर्ग ८ ते १२ वीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी हेमराज ठाकरे, बाबुराव उईके, रामदास शहारे यांनी सहकार्य केले. संचालन व आभार क्रीडा संघटक शाहिद कुरेशी यांनी केले

Web Title: Cuttack School Dr. Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.