शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

लवकर लवकर रोवा, अन् पाटलाच्या घरी घुगऱ्या खावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

पालांदूर : रोवणी म्हणजे बळीराजाचा एक प्रकारचा उत्साहच असतो. रोवणीसाठी सर्वांना हातात घेत सहकार्याच्या भावनेने रोवणीचे काम करावे लागते. ...

पालांदूर : रोवणी म्हणजे बळीराजाचा एक प्रकारचा उत्साहच असतो. रोवणीसाठी सर्वांना हातात घेत सहकार्याच्या भावनेने रोवणीचे काम करावे लागते. रोवणीत मजूर अत्यंत महत्त्वाचा बळीराजाचा सहकारी आहे. यांत्रिक युगातही मजुरांची सुमार टंचाई रोवणीच्या दिवसात बळीराजासह मजुराचे घरी पहाटेपासूनच रोवणीची तळमळ सुरू होते. शेतात सुद्धा प्रत्येक मजुराला काम करावे लागते. रोवणीच्या शेवटच्या दिवशी बळीराजासह मजुरांनाही अत्यानंद होतो. सकाळपासूनच सायंकाळच्या गुगऱ्यांची प्रसंगी जेवणाची आठवण सगळ्यांनाच होते. मजूर एकमेकाला लवकर लवकर रोवा अन् पाटलाच्या घरी घुगऱ्या खावा. असा सूर देत रोवणीचा उत्साह द्विगुणित केला जातो

रोवणी करताना धुरे-पारे मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम पऱ्हे काढणे, पेंड्या बांध्यात पसरविणे, रोवणीच्या बांधीत ट्रॅक्टर अथवा नांगराच्या साहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते. ग्रामीण भागातील मजूर महिला आजही रोवणीची गाणी म्हणत रोवणीला बहर चढवितात.

भंडारा जिल्हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर, किटाडी परिसरातील शेतशिवारात सिंचनाच्या सोयी नसल्याने खरीप हंगामात दमदार पावसाच्या सरी बसल्यानंतर ८ जुलै रोजी रोवणीचा श्रीगणेशा करण्यात आला. मात्र वरुणराजा रजेवर गेल्याने पावसाने विश्रांती घेतली. नर्सरीतील पऱ्ह्यांची मोठी वाढ झाली. तब्बल १३ दिवसानंतर पुन्हा दमदार पावसाच्या साक्षीने परिसरातील खोळंबलेल्या रोवणीच्या कामांना वेग आला. चातकापेक्षाही अधिक आतूरतेने आकाशाकडे टक लावून पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. महिला मजुरांची टंचाई होती. मजुरीचे दरही गगनाला भिडले. गुता (हुंडा) पद्धतीत प्रती एकर ३२०० तर मजुरी २०० रुपये आहे. सध्या रोवणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. शेतशिवार शेतकरी व महिला मजुरांनी बहरलेले दिसते.

पूर्वीच्या काळात अन आता खूप तफावत आहे. आधुनिक युगात शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात नांगरणी, चिखलणी करीत आहेत. मात्र अल्पभूधारक शेतकरी बैल नांगराचा उपयोग करीत आहेत. सर्वच महिला एका सरळ रेषेत उभ्या राहून रोवणीला सुरुवात करतात. रोवणीचा आनंदाचा सोहळा शेतकरी आपल्या शेतात फुलवितात. प्रौढ व म्हाताऱ्या महिला पारंपरिक गाणी आपल्या तालासुरात गातात. त्यांच्या गाण्यात अर्थ व बोध असतो. गीताच्या रुपात दंतकथा दडलेली असते. पौराणिक कथा, जुन्या पारंपरिक गाण्यांमध्ये गोडवा असून मन हेलावते. त्यात युवापिढीतील तरुणीही सहभागी होतात. हास्याचे फवारे उडविणारे चुटकुले, जोक्स सादर करीत रोवणीला बळ देतात. पहाटे जागे होऊन घरकामाची आवराआवर करणे, स्वयंपाक करणे, शिदोरीचा डबा भरणे अशी कसरतही महिला मजुरांना करावी लागते.

बॉक्स

रोवणी संपल्याची ओळख कालबाह्य!

शेवटच्या दिवशी रोवणी संपली की, पाणी, चिखल, मातीचा खेळ खेळतात. डफळीचा वाजा करून शेतातून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढतात. त्यात बैलजोडीसह नांगर, शेतकरी, वणकर, फणकर, पेंडकर, नांगऱ्या, मजूर महिला गाणी म्हणत म्हणत जातात. घरी पोहचताच बळीराजाच्या घराच्या भिंतींवर चिखलाने बैल नांगराची, बांध्याची व माणसांची चित्रे काढून पूजा करतात. मजुरांना नाश्ताप्रसंगी जेवण व बोजाराही दिला जातो. ही रोवणी संपल्याची ओळख असते. मात्र हल्ली ही प्रथा कालबाह्य होत आहे.

मोऱ्या झाला कालबाह्य!

शेतात रोवणी करीत असताना पाऊस ,वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी आधी मोऱ्या पांघरीत असत. रोवणी रोवणाऱ्या मजुरांना दिवसभर चिखलात रहावे लागत असून पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून मोऱ्याच्या सभोवती प्लास्टिक कागदाचे आवरण व्यवस्थित सुई दोऱ्याने शिवणकाम केले जात असे. मात्र उबदार असलेला मोऱ्या कालबाह्य झाला असून कमरेला प्लास्टिक कागद बांधून रोवणी करतानाचे चित्र शेतशिवारात पहायला मिळते.