शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

क्रिकेट सामन्यावर सट्टा, पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 9:56 PM

भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरूअसल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकली. यात एका इसमाला अटक करून ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देएकाला अटक : ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरूअसल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकली. यात एका इसमाला अटक करून ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात अमीत मनोहर उदापुरे नामक इसम हा सुरु असलेल्या भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा, बेटींग करीत असल्याची माहिती मिळाली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. मानकर यांनी सापळा रचून गणेशपूर येथे धाड घातली. यात अमीत उदापुरे याला मुद्देमालासह अटक केली. त्याच्या ताब्यातून ५ मोबाईल, १५ हजार रुपयांची रोख, हिशोब ठेवण्याचे रजिस्टर, एलईडी टिव्ही, सेटटॉप बॉक्स असा एकुण ८१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उदापुरे विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र महाजन, पोलीस निरीक्षक सचिन गदादे, सहाय्यक फौजदार अश्विनकुमार मेहर, हवालदार तुलशीदास मोहरकर, पोलीस नायक विजय तायडे, निरंजन कढव, किशोर मेश्राम, शिपाई शैलेश बेदुरकर, पंकज भित्रे, अर्चना कुथे, सुप्रिया मेश्राम यांनी सहभाग नोंदविला.मागीलवर्षीही स्थानिक गुन्हे शाखेला माहित न होता नागपूर पोलिसांनी भंडारा येथे क्रिकेट सामन्यांवर लावण्यात आलेल्या बेटिंग केंद्रावर धाड मारून मोठी कारवाई केली होती. याला प्रतिउत्तर म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जावून कारवाईला अंजाम दिला होता. तब्बल वर्षभरानंतर क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे क्रिकेटच्या सट्ट्यासह अन्य अवैध व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यावर नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांवर आळा घालण्याचे आव्हान आहे.