लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन सदैव तत्पर असून महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. महिला बचत गटांनी बांबु लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रशासन जमीन उपलब्ध करुन देईल. महिला बचत गटाच्या माध्यमातून सौर वीज प्रकल्प प्रत्येक गावात राबविण्याचे नियोजन आहे.बचत गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, उमेद प्रकल्प व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ डिसेंबर २०१८ दरम्यान दसरा मैदान शास्त्री चौक, भंडारा येथे वैनगंगा कृषि महोत्सव व सरस महिला बचत गट विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन आज पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, विभागीय कृषि सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. हिंदुराव चव्हाण, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सतीश राजू, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे, नगरपालिका उपाध्यक्ष आशिष गोंडाणे व दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेमध्ये राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना जोडले जाणार असून दिवसा चालणारे वीज प्रकल्प टाकण्याची योजना असून भंडारा जिल्ह्यात प्रत्येक गावात सौर कृषि प्रकल्प उभारण्यात येणार आहे.कृषि प्रदर्शन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, परिसंवाद चर्चासत्र, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचत गट निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही महोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रदर्शनीमध्ये लागलेल्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पांदण रस्ते, महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी, जलसंधारण, शेतकºयांना पाणी व वीज आणि सौर उर्जा प्रकल्प या महत्वाच्या विषयांवर भंडारा जिल्ह्यात विकास नियोजित केला आहे.महिला बचत गटांना हे प्रकल्प चालविण्यासाठी देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी प्रासताविक तर प्रकल्प संचालक मनिषा कुरसंगे यांनी महोत्सवविषयी माहिती विषद केली. संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंजुषा ठवकर यांनी मानले. कृषि महोत्सवात एकूण १५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
बचत गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:37 IST
महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन सदैव तत्पर असून महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. महिला बचत गटांनी बांबु लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रशासन जमीन उपलब्ध करुन देईल.
बचत गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करा
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : भंडारा येथे कृषी महोत्सवाचे उद्घाटन, भंडारा ब्रँड ‘उमेद’चे विमोचन