शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वर्षभरात भेगा, रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:43 IST

चौकशीची मागणी : कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा-कोसरा : कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. कामावर एक वर्षात पवनी ते कोंढादरम्यान मोठमोठ्या भेगा पडल्याने कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भेगांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी जोर धरत आहे.

नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गाला लागून कारधा नीलज राज्य मार्गास राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ अशी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार याचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. पण, काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर दिसून येते. कोंढा ते पवनीपर्यंत महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

रस्त्याच्या मधोमध भेगा असल्याने सायकलस्वार, मोटारसायकलस्वारांचे चाक खड्यात जाऊन अनेक दुचाकीस्वार पडले आहेत. चार दिवसांपूर्वी कोंढा येथील नंदकिशोर नागपुरे पवनीहून येत असताना रस्त्याच्या उभ्या पडलेल्या भेगेत गाडीचे चाक जाऊन गाडीवरून पडले. त्यामुळे त्यांचे पाय मोडले. अशा अनेक घटना दररोज महामार्गावर तरीदेखील याकडे होत आहेत. कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. सध्या मोटारपंप शेतकरी रोवणी करीत आहेत, चिखल घेऊन ट्रॅक्टर असणारे शेतातील रोडवर माती चिखल महामार्गावर पसरवीत असल्यानेदेखील अपघात होत आहे- कारधा नीलज महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे- एक वर्षातच या महामार्गाला ठिकठिकाणी उभ्या भेगा पडल्या आहेत.

चौकशीची मागणीकाम करताना योग्य काँक्रीट, सिमेंट याचा वापर केला नाही. राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी माझ्या विभागात कोणताही भ्रष्टाचार नाही, असे म्हणत असतात. पण, महामार्गाचे काम पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महामार्गाच्या कामात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. चौकशी करून भेगा बुजविण्याचे काम करावे व होत असलेले अपघात टाळावेत, अशी मागणी कोंढा येथील मुरली नागपुरे व गावकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गbhandara-acभंडारा